सामान्य नागरिकांचा प्रश्न
विजय गायकवाड
शिवसेनेच्या आमदारांसह राजकीय ( political ) पदाधिकाऱ्यांनी मग्रारोहयो बैठकीत गटविकास अधिकाऱ्यांच्या ( Block Devlopment Officer ) गलथान व बेशिस्त ( Unruly ) कारभाराचा पंचनामा ( Panchnama ) करून त्यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले. सरकारी कामात ( Government Work ) हलगर्जीपणा किती असावा. हे परवाच्या बैठकीतून सिध्द झाले. त्यामुळे या बैठकीत ( Meeting ) चांगलेच 'महाभारत' घडले. परंतु एवढी कानउघाडणी करूनही बीडीओंच्या कारभारात सुधारणा होईल का? असा प्रश्न ( Question ) नागरिक ( Citizens ) उपस्थित करीत आहेत.
'सरकारी काम अन् सहा महिने थांब' हा वाक्प्रचार रूढ झालेला आहे आणि सामान्य नागरिकांना ते अंगवळणी पडले आहे. परंतु परवाच्या दिवस पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित मग्रारोहयो बैठकीत दस्तुरखुद्द शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे ( MLA Ramesh Bornare ) व अन्य पदाधिकाऱ्यांना मात्र 'सरकारी काम अन् वर्षं - वर्ष थांब'ची प्रचीती आल्याने सर्वच आवाक झाले. त्यामुळे बोरनारे यांच्यासह व्यासपीठ व उपस्थित नागरिकांनी गटविकास अधिकारी देव घुनावत यांच्या 'कर्तृत्वाचा' पाढा वाचून चांगलेच फैलावर घेतले. कार्यालयप्रमुख ( Head of Office) म्हणून भान विसरलेल्या या अधिकाऱ्याला लोकप्रतिनिधी ( People's Of Representative ) व नागरिकांनी जाणीव करून द्यावी म्हणजे ही शोकांतिका म्हणावी लागेल.
पंचायत समिती ( Panchayat Samiti ) ग्रामीण भागातील विकासाचा केंद्रबिंदू व मिनी मंत्रालय ( Mini Ministry ) समजले जाते. नागरिकांची या कार्यालयावर मोठी मदार आहे. तेथूनच नागरिकांना जर वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या जात असेल तर अपेक्षा ठेवायची कुणाकडून? हा प्रश्न आहे. पेव्हर ब्लॉकची ( paver Block ) कामे वर्षभरापासून प्रलंबित आहेत. या कामांची माहिती ग्रामसेकांना माहिती नसल्याचा गंभीर प्रकार बैठकीत समोर आला. त्यामुळे तालुक्यात नेमकं काय चाललंय? हे तपासणी करण्याचे काम बीडीओंचे नाही का? त्यांच्या अनभिज्ञतेमुळे आमदार बोरनारे व अन्य पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर थेट हल्लाबोल करून चांगलेच फटकारले. एवढेच नव्हे तर 'बीडीओ, तुम्ही अकार्यक्षम आहात, चालते व्हा' इथपर्यंत त्यांना सुनाविण्यात आले. याशिवाय कार्यालयात थांबत नाही, सरपंच व नागरिकांना भेटत नाही. केवळ पाट्या टाकण्याचे काम सुरू आहे. असाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
आपल्या गलथान कारभाराची लक्तरे अशी वेशीवर टांगली जाण्यापर्यंतची वेळ अधिकाऱ्यांनी येऊ देऊ नये. असे होत असेल तर हे कशाचे द्योतक मानावे? त्यामुळे अधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बीडीओंनी नव्यानेच पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत कुणाला आकस अथवा व्देष असण्याचे कारण नाही. परवाच्या बैठकीत केवळ त्यांच्या गलथान कारभाराचाच पंचनामा झाला. तत्पूर्वी तालुक्यातील चोरवाघलगाव येथील ग्रामस्थांनी ते कार्यालयात गैरहजर असल्याने त्यांच्या खुर्चीलाच हार घातला. यातून एवढाच अर्थ निघतो की, बीडीओ सामान्य नागरिकांच्या रोषाचे धनी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी कारभारात वेळीच सुधारणा करून घेणे गरजेचे आहे अन्यथा जनक्षोभ असाच वाढत जाईल अन् ते रोषाचे धनी ठरतील. परिणामी यातून काहीही उद्रेक होऊ शकतो. एवढया शाब्दिक टोल्यानंतरही बीडीओंच्या कारभारात सुधारणा होईल का? असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
सोमवारी पुन्हा कार्यालयाला दांडी
दरम्यान मग्रारोहयो ( Mregs ) बैठकीत एवढे 'महाभारत' घडूनही गटविकास अधिकारी सोमवारी मुख्यालय दिनी ( Head Quarters Day ) कार्यालयात गैरहजर होते. ते दिवसभर कार्यालयाकडे फिरकलेच नाही. ते रजेवर होते की दौऱ्यावर? याबाबत काहीच कळू शकले नाही. याबाबत कर्मचाऱ्यांकडून कानोसा घेतला असता, त्यांनी काहीच माहिती नसल्याचे सांगितले. बीडीओंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. परंतु असे असले तरी परवाचे महाभारत घडल्यामुळे ते बदली करून घेण्यासाठी मुंबईत असल्याची चर्चा नागरिकांसह कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती.
0 Comments