Vaijapur Assembly Constituency | तीन लाख ७ हजार मतदार; अंतिम यादी प्रसिद्ध

0

सारखी छायाचित्रे, दुबार नावे वगळली 


 

वैजापूर विधानसभा मतदारसंघात राबविण्यात आलेल्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमानुसार मतदारसंख्या तीन लाख ७ हजार ३६८ एवढी आहे. यामध्ये एक लाख ६१ हजार ३४९ पुरुष व एक लाख ४६ हजार १४ स्त्री मतदारांचा समावेश आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा २०८ मतदार कमी झाले आहेत. सारखे छायाचित्र, दुबार नावे व मृत मतदारांची नावे वगळण्यात आली आहे.






वैजापूर विधानसभा मतदारसंघात १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित २८ आॅक्टोबर २०२३ ते ५ जानेवारी २०२४ या कालावधीत मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. महसूल विभागासह विविध शासकीय यंत्रणेमार्फत ही मोहीम राबविण्यात आली. मोहिमेनंतर २३ जानेवारी २०२४ रोजी विधानसभा मतदारसंघाची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली.




 त्यानुसार विधानसभा मतदारसंघाची मतदारसंख्या ३ लाख ७ हजार ३६८ एवढी आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत एवढ्या मतदारांना मतदानाचा अधिकार असणार आहे. यामध्ये एक लाख ६१ हजार ३४९ पुरुष व एक लाख ४६ हजार १८ स्त्री मतदारांचा समावेश आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदारसंख्या तीन ७ हजार १६० एवढी होती. यामध्ये एक लाख ६० हजार ८८९ पुरुष व एक लाख ४६ हजार २६८ स्त्री मतदारांचा समावेश होता. 







सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून गंगापूर तालुक्यातील ५२ गावांचा समावेश वैजापूर विधानसभा मतदारसंघात करण्यात आला आहे. या ५२ गावांतील मतदारसंख्या ५४ हजार ७६ एवढी आहे. यामध्ये २८ हजार ५३९ पुरुष तर २५ हजार ५३७ स्त्रियांचा समावेश आहे. वैजापूर शहरात एकूण ४१ हजार ३७७ मतदारसंख्या असून यामध्ये २० हजार ७५२ पुरुष व २० हजार ६२५ स्त्री तर ग्रामीणमध्ये म्हणजेच तालुक्यात दोन लाख ११ हजार ७०७ मतदारसंख्या असून यामध्ये एक लाख ११ हजार ५९८ पुरुष व एक लाख १०६ स्त्रियांचा समावेश आहे. 




नेत्यांची कार्यक्रमांना हजेरी 




लोकसभेचा कार्यकाळ संपत आल्याने निवडणूक कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो. असे गृहित धरून प्रशासकीय यंत्रणेसह विविध राजकीय पक्षांचे पुढारी कामाला लागले आहेत. स्थानिक नेतेमंडळींनीही मोर्चेबांधणी सुरू केली असून या पार्श्वभूमीवर लग्न समारंभ, धार्मिक, सामाजिक व अन्य विविध कार्यक्रमांना हजेरी मतदारसंघ पिंजून काढीत आहेत. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली असून कार्यक्रम केव्हाही जाहीर होऊ शकतो. असे गृहित धरून सर्वांचीच धावपळ सुरू झाली आहे. 




 नावे वगळली 




मतदार पुनरीक्षण कार्यक्रमातर्गंत बहुतांश मतदारांची नावे वगळण्यात आली आहे. यामध्ये मयतांसह सारखी छायाचित्र व दुबार नावांचा समावेश आहे. दुबार नावे असलेले ७६६ तर सारखी छायाचित्र असलेले १०८७ मतदार होते. ही नावे या यादीतून वगळण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 




 मतदारसंघातील स्त्री - पुरुष मतदारसंख्या


                         स्त्री           पुरुष          एकूण 

वैजापूर शहर      २०,६२५    २०,७५२       ४१, ३७७


वैजापूर ग्रामीण   १,००१०६   १,११५९८     २,११७०७


गंगापूर तालुका    २५,५३७     २८,५३९       ५४,०७६

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top