वैजापुरातील सभेत जहरी टीका
देशात हुकूमशाही सुरू झाली असून ती मोडीत काढण्यासाठी मला तुमची साथ पाहिजे. त्यामुळे आगामी लोकसभेसह विधानसभा निवडणुकीत त्यांना जागा दाखवून देश वाचवा. असे आवाहन करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde) हे सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ( Home Minister Devendra Fadnavis) घरफोडे,पक्षफोडे व फडतूस आहेत. भाजप ( BJP ) हा बाजार गुंडांचा पक्ष झाला आहे. अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी येथे केली. वैजापूर ( Vaijapur ) शहरातील ( City ) पंचायत समिती कार्यालयासमोर ( Panchayat Samiti Office) जनसंवाद ( Jansamvad ) दौऱ्याच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते.
खासदार संजय राऊत(Sanjay Raut), विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर ( Bhausaheb Patil Chikatgaonkar), ॲड. आसाराम रोठे, संजय निकम, सचिन वाणी, अजय पाटील चिकटगावकर, मनाजी मिसाळ आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, माझी मुख्यमंत्री पदासाठीची लढाई नसून मी केवळ जनतेच्या लढाईसाठी मैदानात उतरलो आहे. राज्यात शेतकरी आत्महत्यांचे ( Farmer Suicide ) प्रमाण वाढले आहे. सिंचनासह शेतकऱ्यांचे प्रश्न 'आ' वासून उभे आहेत. अशा परिस्थितीत मिंधे सरकार व सहकारी मित्रपक्षांचे केवळ हिन पातळीवरचे राजकारण ( Politics) सुरू आहे. ज्या पक्षात तुम्ही मोठे झाले. तुम्हाला सत्तेवर बसविले. तुम्ही तोच पक्ष संपवून खंजीर खुपसला. तुम्ही अक्षरशः शिवसेना चोरली. चिन्हही चोरले. रावणाला जिथे शिवधनुष्य पेलले नाही. तेव्हा धनुष्यबाण ( Dhanushyaban) तुम्हाला कसा पेलणार? असा प्रश्न उपस्थित करून निवडणूक आयोगाने काहीही निकाल देवोत.तो आम्हाला मान्य नाही. शिवसेना व धनुष्यबाण हा आमचाच होता आणि राहिलं. असे ठणकावून सांगितले.
निवडणुका वाटल्यास तर पुढे ढकला आम्हाला सत्ता नको. पण शेतकऱ्यांचा सातबारा मात्र कोरा करा. राज्यात कांदा, सोयाबीन, कापसाला शेतीमालाला भाव नाही. राज्य सरकारने फसव्या पीकविमा योजनेने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. राज्यात आमचे सरकार ( Government ) असताना मी शेतकऱ्यांचे २२ हजार कोटींचे कर्ज माफ केले. देशातील काश्मीर ते कन्याकुमारीपर्यँतच्या सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. असेही ते म्हणाले. भाजप हा भ्रष्टाचारी जनता पक्ष असून काही दिवसांपूर्वी अजित पवारांवर आरोप करणारे आज त्यांना सत्तेत घेऊन बसलेत. आज भाजप देशात सर्वत्र फोडाफाडीचे राजकारण करत आहे. तो पक्ष म्हणजे बाजार गुंडाचा पक्ष झाला आहे. पक्षात निष्ठावंताची कदर नाही. यामुळे की काय आगामी काळात कदाचित भाजपचा पक्ष प्रमुख हा काँग्रेसचाच एखादा नेता राहणार आहे.
आमचे हिंदुत्व हे चूल पेटवणारे तर भाजपचे हिंदुत्व हे घरे पेटवणारे असल्याची टीका त्यांनी यावेळी केले. संजय राऊत यांनी तरुंगात जाणे मान्य केले पण ते भाजपमध्ये गेले नाही. सर्व भ्रष्टाचारी एकत्र आल्याने कोण कोणासोबत आहे? हे समजायला मार्ग नाही. मी देखील भाजपमध्ये जाऊ शकलो असतो. परंतु देश हुकुमशाहीपासून वाचवायचा असल्याने तुमच्या आयुष्याच्या लढाईसाठी मी मैदानात उतरलो असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. खासदार राऊत म्हणाले की, गद्दारांनी खंजीर खुपसला. २०१९ झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी ठाकरे आज येथे आले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत सर्वच आमदार शिवसेनेचे निवडून येतील. एवढेच नव्हे तर आगामी काळात ठाकरे हे देशाचे नेतृत्व करतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांचेही यावेळी भाषण झाले. सभेस कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
अशोकराव 'गेले' अन् धक्का बसला
ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्याच्या पार्श्वभूमीवर 'आज अशोकराव गेले आणि धक्काच बसला' असा उल्लेख करून अचानक पाॅज घेत 'गेले म्हणजे, तसे गेले समजू नका'. भाजपमध्ये गेले. असे मला म्हणायचे होते. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. कालपर्यंत जागा वाटपांमध्ये चव्हाण यांनी हिरीरीने भाग घेतला आणि त्यांचा काय 'आदर्श' घेतला पाहिजे. चव्हाण आणि भाजपाचा 'आदर्श' वेगवेगळा असल्याचा ते म्हणाले. शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांचे नाव न घेता सर्वच वक्त्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.