Uddhav Thackeray | पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार? उत्सुकता शिगेला

0

वैजापुरात सभा; जनसंवाद दौरा 


 

राज्यात सुरू असलेल्या राजकीय घमासानाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उध्द्वव ठाकरे ( Uddhav Thackeray) हे १२ फेब्रुवारी रोजी जनसंवाद दौऱ्याच्या निमित्ताने वैजापूर येथे येत आहेत. यानिमित्ताने होणाऱ्या सभेत ते नेमके काय बोलतात? याबाबत तालुक्यातील नागरिकांना उत्सुकता लागून आहे.











   उध्द्वव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर ( Abhishek Ghosalkar ) यांची दोन दिवसांपूर्वी गोळ्या घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानंतर उध्द्वव बाळासाहेब ठाकरे गट अन्य राजकीय विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना 'लक्ष्य' करीत निशाना साधण्याची एकही संधी सोडली नाही. विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief minister Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) या दोघांनाही तोफेच्या तोंडी ठेवून चांगलेच रान उठविले आहे. 





याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्द्वव ठाकरे या दोघांमध्ये जोरदार चिखलफेक सुरू झाल्याने ऐन थंडीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीचा ( Loksabha elections) बिगुल केव्हाही वाजण्याची शक्यता असल्याने या चर्चांना महत्त्व प्राप्त झाले आहे. १५ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर ( Chatrapati Sambhajinagar) येथे देशाचे गृहमंत्री अमित शाह ( Home Minister Amit Shah) यांचीही सभा होणार आहे. त्यापूर्वीच उध्द्वव ठाकरे यांची सभा वैजापूर ( Vaijapur  ) येथे होणार असल्याने राजकीय वर्तुळात ( In Political Circles) तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर होत असलेली चिखलफेक, 'फाळणी' झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( A Divided Nationalist Congress Party ) , घोसाळकर हत्या प्रकरण ( Ghosalkar Murder Case ), सत्ताधारी ( The Ruler ) व विरोधकांमध्ये ( Opponent  ) घमासान सुरू आहे. 





सर्वांनीच 'कमरेचे सोडून डोक्याला बांधल्याने' राज्यातील जनतेचेही मनोरंजन होत आहे. परंतु असे असले तरी राज्यात याशिवायही अनेक ज्वलंत प्रश्न 'आ' वासून आहेत. सामान्य माणसांना केंद्रस्थानी ठेऊन कुणीच बोलायला तयार नाही. त्यामुळे  'शिळ्या कढीला ऊत आल्याप्रमाणे' या मुद्द्यांवरून भांडवल करण्यापेक्षाही सत्ताधारी व विरोधकांनी राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घातला पाहिजे. अशी रास्त अपेक्षा जनतेला आहे. चिखलफेक, टीका - टिप्पणी व कलगीतुऱ्याने केवळ मनोरंजन होऊ शकते. समस्या मात्र तशाच राहतात. राज्यात सुरू असलेले घमासान चाकरमान्यांच्या पथ्यावर पडत आहे. परिणामी सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचारी कुणालाच मोजायला तयार नाही. राज्यकर्ते व विरोधक भांडणात व्यग्र असताना त्यांना नोकरशाहांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून 'अंधेर नगरी चौपट राजा' असा कारभार सरकारी कार्यालयांचा सुरू आहे.





 दरम्यान ठाकरे वैजापुरात येण्याच्या पार्श्वभूमीवर पक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी डिजिटल फलक लावून वातावरण निर्मिती केली आहे. 'निष्ठावंतांचा मेळावा' अशा खोचक बॅनरबाजीने विरोधकांना 'घायाळ' करण्याचा प्रयत्न यातून केला गेला. माजी आमदार भाऊसाहेब पाटील  चिकटगावकर ( Bhausaheb Patil Chikatgaonkar ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ठाकरेसेनेत प्रवेश केल्यानंतर उध्द्वव ठाकरे प्रथमच शहरात येत आहेत. त्यामुळे चिकटगावकरांनीही राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी आपली संपूर्ण ताकद व प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दुसरीकडे 'निष्ठावंत' म्हणून तोरा मिरवत असलेल्या दुसर्‍या फळीतील नेते व पदाधिकाऱ्यांनीही चिकटगावकरांच्या 'वरचढ' होण्याचा आटापिटा सुरू केला आहे. त्यामुळे येथील सभेत ठाकरे काय बोलतात? संभाषणात कुठले प्रश्न येतात? की पुन्हा 'येरे माझ्या मागल्या' प्रमाणे तिच राळ अन् तिच चिखलफेक होते की काय? हा प्रश्न मात्र सध्यातरी अनुत्तरीत आहे. 




ठाकरे तरी बोलतील का? 


गेल्या कित्येक दिवसांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या व प्रश्नांवर कुणी बोलायला तयार नाही. गेल्या वर्षी झालेल्या कमी पावसामुळे शेतीव्यवसाय संकटात सापडला असून ऐन फेब्रुवारी महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांवर वणवण भटकंती करण्याची वेळ आली. कांद्यासह शेतमालाचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. वैजापूर शहर व तालुक्यातील बहुतांश प्रश्न आहेत. त्यामुळे ठाकरे वैजापूर येथील सभेत राजकारणाच्या  पलिकडे जाऊन सामान्यांच्या प्रश्नांवर बोलतील का? हाच प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top