Nandur Madhmeshwar Canal | अन् 'त्यांनी' थेट घेतल्या कालव्यात उड्या.!

0

पाणी मिळत नसल्याने उद्रेक 




नांदूर मधमेश्वर कालव्याचे पाणी मिळत नसल्याने वैजापूर तालुक्यातील पानवी बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. दरम्यान पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना तात्काळ ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

 







नांदूर मधमेश्वर कालव्याच्या चारी क्रमांक २३ चे काम व्यवस्थित न झाल्याने त्यामधून पाणी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. परिणामी वैजापूर तालुक्यातील पानवी (बुद्रुक) येथील शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले. नांदूर मधमेश्वर कालव्याच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ  शेतकऱ्यांना पाणी पोहोचेल. अशी व्यवस्था करावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मागणी मान्य न झाल्यास नांदूर मधमेश्वर कालव्यात जलसमाधी घेत सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. 








याच अनुषंगाने २५ फेब्रुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेकडो शेतकऱ्यांनी चारी क्रमांक २४ च्या गेटजवळ जमा होऊन आंदोलन सुरू केले. नांदूर मधमेश्वरचे कोणीही अधिकारी आंदोलनस्थळी न आल्याने शेतकऱ्यांनी पाण्यात उडी घेत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळेचं पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. काही वेळाने आंदोलनस्थळी अधिकारी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता शेतकऱ्यांना पाणी पोहोचण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून आले.




 अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना अडथळा दूर करून देणार असल्याचे लेखी आश्वासन दिले आहे.  त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात संदिप गायकवाड, गजानन गायकवाड, साहेबराव गायकवाड, बाळासाहेब नेमाने, बबन गायकवाड, हरी गायकवाड, गणेश गायकवाड, नानासाहेब गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, हरिभाऊ गायकवाड, किरण गायकवाड, सुनील गायकवाड, शिवाजी गायकवाड, वाल्मिक गायकवाड, शशिकांत गायकवाड, संतोष गायकवाड, रमेश गायकवाड, किशोर गायकवाड आदी शेतकरी सहभागी झाले होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top