मातेसह लहानगा सुखरूप बचावला
एखाद्या चित्रपटातील कथानक (The plot Of Movie) शोभावे अशी थरारक ( Thrilling ) व अंगावर काटा आणणारी घटना घडली. 'तो' तेरा महिन्यांचा चिमुकला खेळत होता.. खेळता - खेळता थेट सात परसाच्या विहिरीत ( In the Well) पडला.. त्याचवेळी त्याच्या आईची (Mother ) नजर तिकडे गेली अन् तिने चिमुकल्याला वाचविण्यासाठी कोणताही विचार न करता २८ फूट पाणी असलेल्या थेट विहिरीतच उडी ( The Jump) घेतली. केवळ उडी नव्हे तर त्याला सुखरूप ( Happily ) बाहेर काढले. परंतु या घटनेत दोघेही किरकोळ जखमी झाले.
नितेश राकेश आखाडे (१३ महिने ) असे चिमुकल्याचे तर निरा राकेश आखाडे (२१ रा. मध्यप्रदेश ह. मु. आघूर ) असे धाडसी मातेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राकेश आखाडे हा आपल्या पत्नीसह तालुक्यातील आघूर शिवारातील राजू कहाटे यांच्या शेतात मजूर म्हणून काम करतात. १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३.० वाजेच्या सुमारास नितेश खेळता - खेळता विहिरीकडे गेला आणि काही वेळातच तो पडल्याचे त्याची आई निरा हिच्या निदर्शनास आले. तिने कोणताही विचार न करता चिमुकल्याला वाचविण्यासाठी थेट सात परसापेक्षाही खोल असलेल्या विहिरीतच उडी घेतली.
तोपर्यंत चिमुरड्याने गटांगळ्या खाल्ल्या होत्या. विहिरीत चार परस म्हणजेच २८ फूट पाणी होते. याही परिस्थितीत तिने कोणतीही तमा न बाळगता चिमुरड्या नितेशचा हात धरला. हा थरार घडत असतानाच आजूबाजूच्या नागरिकांसह महिलांनीही विहिरीकडे धाव घेऊन दोघांनाही वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. विहिरीत दोरखंड सोडून त्याच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दोघांनाही वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविले. दोघांनाही किरकोळ जखम झाली असली तरी ते सुखरूप आहेत.
अन् काळजाचा ठोका चुकला
दरम्यान मध्यप्रदेशातील एका खेड्यातून मंजुरीसाठी हे दांपत्य येथे आलेले आहे. चिमुकला नितेश हा जेव्हा विहिरीत पडला अन् आजूबाजूंच्या सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. क्षणभर नेमके काय करावे? कुणालाच काही सुचेना. अशाही संकटकाळी परिस्थितीत फक्त निरा हिलाच सुबुद्धी सुचली अन् तिनेच उडी टाकून आपल्या बछड्याला वाचविले. त्यानंतर दोघांनाही वाचविण्यासाठी अन्य नागरिकांनी दाखविलेली तत्परता प्रशंसनीय म्हणावी लागेल.
तिला पोहता येत नसतानाही...
विशेष म्हणजे नीरा हिला पोहता येत नसतानाही चिमुकल्याला वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारण्याची हिंमत केली. पोहता येत नसतानाही तिने जवळपास ५२ फुट असलेल्या विहिरीत स्वतःला झोकून दिले अन् चिमुकल्याला वाचविले. यात विशेष म्हणजे तिच्या धाडस आणि तत्परचे कौतुक करावे लागेल. तिने कदाचित प्रसंगावधान राखले नसते मोठा अनर्थ होऊ शकला असता.