समाजबांधवांची गर्दी
नाशिक - छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर ( Nashik - Chatrapati Sambhajinagar National Highway) असलेल्या नगरपालिकेच्या ( Nagarpalika ) जागेवर १० फेब्रुवारी रोजी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे ( Sahityasamrat Annabhau Sathe ) यांचा पूर्णाकृती पुतळा ( Full Length Statue) बसविण्यात आला. हा पुतळा नेमका कुणी बसविला? हे मात्र अद्याप गुलदस्त्यात असले तरी राजकीय नेत्यांसह ( Political Leaders) मातंग समाजबांधवांची मोठी गर्दी होऊन त्यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले.
शहरातील येवला रस्त्यावरील लाडगाव कमान परिसरात असलेल्या पालिकेच्या जागेवर शनिवारी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले. पुतळा स्थापन झाल्याची वार्ता शहरात पसरताच नागरिकांनी तेथे मोठी गर्दी केली. भारतीय जनता पक्षाचे नेते डॉ. दिनेश परदेशी, संजय बोरनारे यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व मातंग समाजबांधवांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. दरम्यान काही दिवसांपूर्वी स्टेशन रोडलगत असलेल्या पालिकेच्या जागेवर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा देखील पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. गेल्या काही दिवसांत शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर महापुरुषांचे पुतळे बसविण्यात आले.