Chatrapati Shivaji Maharaj | 'या' गावातही उभारला 'छत्रपतीं'चा पुतळा, गुन्हा दाखल

0

शिवभक्तांनी मध्यरात्री सरसावले 



वैजापूर तालुक्यातील गोळवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांचा ( Chatrapati Shivaji Maharaj) अश्वारूढ पुतळा ( Statue ) बसविण्यात आला. परंतु हा पुतळा नेमका कुणी बसविला ? हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात ( Vaijapur Police Station) अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.










    सध्या शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या संख्यने महापुरुषांचे पुतळे बसविण्यात येत आहे. मंगळवारी मध्यरात्री देखील गोळवाडी येथील मारुती मंदिराशेजारी असलेल्या खुल्या सार्वजनिक जागेत अज्ञात शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ  पुतळा बसविला. ही बाब बुधवारी सकाळी  उघडकीस आली.  ग्रामसेवक सुनील विष्णुपंत जाधव (रा.पालखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top