School Activities | सेंट मोनिका शाळेचा कार्यक्रम रंगला

0

मुलांचा नृत्याविष्कार 



वैजापूर शहरातील ( Vaijapur City) सेंट मोनिका इंग्लिश शाळेच्या ( Saint Monica English School) सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त  आयोजित कार्निव्हल कार्यक्रमात लहान बालकांनी नृत्याविष्कार सादर करुन सर्वांची मने जिंकली. 










संस्थेच्या सचिव व माजी नगराध्यक्ष शिल्पा परदेशी, विश्वराज परदेशी, मुख्याध्यापक किशोर साळुंके, स्वाती खैरनार, अमोल धामणे, राहुल नवले यांनी स्व. शरदचंद्र साळुंके यांच्या प्रतिमेचे पुजन केल्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने झाली. डॉ.‌सुरेखा  जऱ्हाड, अंजली जोशी, शशी अग्रवाल, तृप्ती संचेती यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. 




शिल्पा परदेशी यांनी प्रास्ताविकात शाळेने मागील पन्नास वर्षांत केलेली शैक्षणिक प्रगती व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाबाबत आढावा सादर केला. नृत्यविष्कारातील सहभागी ३१ विद्यार्थ्यांनी अतुलनिय सामूहिक नृत्य सादर केले. नागेश बापट, डी.एस. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. आनंद मार्कम, व्ही.डी.पानपाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. सपना देसाई, प्रांजल कोठारी यांच्यासह सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. आनंद हिरण यांनी आभार व्यक्त केले. वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top