Samruddhi Mahamarg | भीषण : कंटेनरला कार धडकली; तिघेजण जागीच ठार

0

'समृद्धी'वरील घटना, मृत जाफ्राबादचे 



 

जालना ( Jalna )  जिल्ह्यातील जाफ्राबादहून ( Jafrabad )  शिर्डीकडे ( Shirdi ) साई दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. भरधाव जाणाऱ्या स्विफ्ट कारने उभ्या असलेल्या कंटेनरला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ( A Terrible Accident ) तिघेजण जागीच ठार तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील ( Nagpur - Mumbai Samruddhi Mahamarg) वैजापूर ( Vaijapur ) - कोपरगाव ( kopargaon ) दरम्यान असलेल्या धोत्रे ( ता. कोपरगाव ) गावानजीक घडली. 









राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे ( तिघेही रा. टेंभुर्णी ता. जाफ्राबाद जि. जालना) अशी अपघातात ठार झालेल्यांची तर रवींद्र फलके ( ३५ रा. तपोवन ता. जाफ्राबाद) व वाघ अशी जखमींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, जालना जिल्ह्य़ातील जाफ्राबाद येथील राहुल राजभोज व त्यांचे अन्य साथीदार शिर्डी येथे साई दर्शनासाठी स्विफ्ट कारने जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार उभ्या असलेल्या कंटेनरवर जाऊन आदळली.




 या अपघातात तिघेजण जागीच ठार तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना ९ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास वैजापूर - कोपरगाव दरम्यान असलेल्या धोत्रे ( ता. कोपरगाव ) गावानजीक नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गावर चॅनल क्रमांक ५०४ जवळ घडली. घटनेनंतर तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. 










परिसरातील नागरिकांनी यातील एका जखमीला आपत्कालीन रुग्णवाहिकेव्दारे संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलविले तर रवींद्र फलके याला रुग्णवाहिकेव्दारे वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ त्यालाही छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान घटनेनंतर कोपरगाव पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्त कारला क्रेनच्या साह्याने बाजूला घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलिसांनी नंतर वाहतूक सुरळीत केली. 



नेमकी कशी घडली घटना? 


नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरून कंटेनर जात असताना त्यातूनच चायनल खाली पडल्याने कंटेनर याच महामार्गावरील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाच्या शिवारात उभे करण्यात आले. पडलेला चायनल कंटेनर चालक उचलत असताना जाफ्राबादहून शिर्डीकडे स्वि फ्ट डिझायर कार भरधाव जात होती. कारवरील ताबा सुटल्याने समोर असलेल्या कंटेनर चालकाला धडक देत कार समोरील कंटेनरवर जाऊन आदळली. या अपघातात तिघेजण जागीच ठार होऊन कारचा चक्काचूर झाला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top