Honour | हळदी - कुंकवाला फाटा देत विधवांचा सन्मान

0

 शिक्षक संघ महिला आघाडीचा पुढाकार 



वैजापूर शिक्षक संघ महिला आघाडीने 'सन्मान स्त्री शक्तीचा , जागर अस्तित्वाचा'  या कार्यक्रमांतर्गंत संक्रातीनिमित्त होणाऱ्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला फाटा देत तालुक्यातील १५१  विधवा महिलांचा चौथ्या वर्षीही सन्मान केला. यात विधवा सैनिक पत्नी, शिक्षक पत्नी व सर्वसामान्य विधवा महिलांचा सन्मान करून अभिनव उपक्रम केला. 








   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहिद सैनिक पत्नी आरती किरण थोरात तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी , माधुरी बनकर, एस. जी .कदम, दीपाली जोरी, शोभना जगताप, रंजना देवकर, कुसुमताई शिंदे ,निर्मला पवार, ललिता देशमुख ,निर्मला मेहर, निर्मला मगर,  डॉ. दीपाली इंगळे, धनश्री आंबेकर  उपस्थित होत्या. सामाजिक व घरगुती कार्यक्रमापासून विधवांना डावलले जात असताना मकर संक्रातीच्या निमित्ताने होणाऱ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास शिक्षक संघ महिला आघाडीने फाटा देत विधवांचा सन्मान करून मानसिक पाठबळ दिले.




 एस. जी.कदम यांनी महिला व समाजकल्याण विभागातर्गंत विधवांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी महिला आघाडीच्या प्रेमा खैरे, मंगल सोनवणे, आशा मोरे, स्मिता पानपाटील,संगीता गोरे छाया उचित, वनिता दयाटे, मीरा टेके , प्रतिभा कांकळीज,वसुंधरा देवरे, स्मिता शिरोळे, निर्मला भोये, निशिगंधा दलाल , क्रांती पिंपळे , अश्विनी शिंदे, वंदना तायडे,मंजुश्री वाळके, दीपाली जोरी,शोभना जगताप, मनीषा गायकवाड ,संगीता साळुंके,नर्मदा आत्राम आदीनीं परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनिता दयाटे, सूत्रसंचलन मीरा टेके तर आभार काकळीज यांनी मानले. नारायण साळुंके, राजेश आत्राम  यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top