Rape Of Women | 'तिला' गाडीत बसविले अन् मग केला बलात्कार

0

तलवाडा शिवारातील घटना 



जमिनीचे डिस्पोजल करून देण्याच्या  बहाण्याने बोलवून एका २५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना २९ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात बलात्कारासह अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पीडित महिला ही एका राजकीय पक्षाची पदाधिकारी आहे. तसे तिने फिर्यादीत म्हटले आहे. 








 

            गणेश बाळू निघुट व कैलास भगत दोघेही रा. चिकटगाव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील पीडित महिला ही छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जटवाडा येथील रहिवासी आहे. गणेश निघुट व कैलास भगत यांनी महिलेला 'तुमच्या जमिनेचे डिस्पोजल करून देतो' अशी थाप मारून काही कागदपत्रे मागवली. ही कागदपत्रे घेऊन पीडित महिला त्यांना भेटली. 




२९ जानेवारी रोजी गणेश व कैलास या दोघांनी महिलेला एका चारचाकी वाहनात बसवून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांनी वाकला रस्त्यालगत असलेल्या एका मंदिराजवळ गाडी आणून थांबविली. अचानक गाडी थांबविल्याने महिला काहीशी गोंधळली. परंतु काही समजण्याच्या आत त्यांनी पीडितेला गाडीबाहेर खेचले व जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. दरम्यान  गणेशने जीवे मारण्याची धमकी देऊन पीडित महिलेवर बलात्कार केला. घटना घडल्यानंतर ३० जानेवारी रोजी महिलेने शिऊर पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी तिने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरा दोघांविरुद्ध बलात्कारासह अॅट्राॅसिटीचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top