रोटेगाव रेल्वेस्थानकाची निवड
अमृत भारत स्टेशन योजनेतंर्गत देशातील ५५४ रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास व दीड हजार ओव्हर ब्रीज व अंडरपासचा ऑनलाईन भूमिपूजन सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) यांच्याहस्ते २६ फेब्रुवारी रोजी पार पडला. याचाच भाग म्हणून वैजापूर शहरालगत असलेल्या रोटेगाव रेल्वे स्थानकाच्याही ११ कोटी ६६ लक्ष रुपये मंजुरीच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, एकनाथ जाधव, भाजपचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, नांदेड विभागाचे रेल्वे प्रबंधक राजेंद्रकुमार मीना, जिल्हापाध्यक्ष कल्याण दांगोडे, कैलास पवार, वरिष्ठ डीसीएम विजयकृष्णा, एसीएम सुब्बाराव, प्रशांत रंगले, नारायण कवडे, दिनेश राजपूत आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी जिल्हाध्यक्ष संजय खंबायते व डॉ. दिनेश परदेशी यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. अमृत भारत स्टेशन योजनेतंर्गत शहरालगत असलेल्या रोटेगाव रेल्वेस्टेशन पुनर्विकास कामासाठी ११ कोटी ६६ लक्ष निधी मंजूर झाला आहे. यामध्ये स्थानक इमारत नूतनीकरण, परिसरातील रस्ता, दुभाजक, विद्युत रोषणाई, प्रतिक्षा हॉल आदी बाबीचा समावेश आहे.