राष्ट्रीय चर्चासत्र ; प्रा.जयदेव डोळेंचे मत
मनुष्य हा समाजशील आहे. समाजातच जीवन व्यतीत करने त्याला आवडते. परंतु सोशल मीडियाच्या ( social media) अतिवापराने तो स्वतःचाच विचार करणारा आत्मकेंद्रित बनल्याचे मत सुप्रसिद्ध माध्यमतज्ञ तथा ज्येष्ठ पत्रकार प्रा.जयदेव डोळे यांनी केले.
वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयातील ( Vinayakrao patil College ) समाजशास्त्र विभागातर्फे आयोजित आधुनिक माध्यमे आणि युवकांसमोरील सामाजिक व सांस्कृतिक आव्हाने या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राच्या ( National Seminar) पहिल्या सत्राचे बीजभाषक म्हणून ते बोलत होते. या राष्ट्रीय चर्चासत्रात ४५ संशोधकांनी भाग घेतला होता. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे, उपप्राचार्य डॉ संदीप परदेशी, मयूर देवकर, चर्चासत्राचे समन्वयक डॉ शेषराव राठोड, सहसमन्वयक डॉ. साहेबराव हिवाळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात चर्चासत्राचे समन्वयक डॉ. शेषराव राठोड यांनी या चर्चासत्राच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट केली.
प्रा.जयदेव डोळे पुढे म्हणाले की, युवकांच्या अति सोशल मीडिया वापराचे दुष्परिणाम विशद करून नवीन पीढीचा कल हा वाचण्यापेक्षा चित्र बघण्याकडे अधिक असून ते धोकादायक असल्याचे सांगितले तर दुसऱ्या सत्रात सुप्रसिद्ध फॅक्ट चेकर मयूर देवकर यांनी व्हॉट्सॲप, फेसबुक,ट्युटर, इन्स्टाग्राम,यू-ट्युब( WhatsApp , Facebook , Twitter, Instagram, YouTube ) यांनी युवकांना त्यांच्या हातातील बाहुले बनविले असून नकळत आपला वापर यांच्याकडून होत असल्याचे विविध उदाहरणांसह स्पष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी या माध्यमातून मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळून पाहण्याचे विविध मार्ग सांगितले.
तिसऱ्या सत्रात अध्यक्षस्थानी डॉ. कालिदास भांगे तर डॉ संदीप चौधरी हे साधन व्यक्ती म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात पारंपरिक आणि आधुनिक माध्यमांतील फरक सांगून आधुनिक माध्यमे लोकांना कशाप्रकारे गोंधळून टाकते यांचे विविध दाखले दिले तर डॉ. भांगे यांनी आजच्या माध्यमांचा वापर संविधानावर ( Constitution ) नियंत्रण ठेवण्यासाठी केला जात असून ते धोकादायक असल्याचे स्पष्ट केले. तसेच माध्यमांनी ( Media ) लोकशाही ( Democracy ) , संविधान यांच्या संरक्षणासाठीची भूमिका निभवावी. असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. सूत्रसंचलन डॉ. शेषराव राठोड यांनी तर डॉ. साहेबराव हिवाळे यांनी आभार मानले. केले यावेळी प्राध्यापक,प्राध्यापकत्तेर कर्मचारी, संशोधक विद्यार्थी, अभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धार्मिक मुद्दा केंद्रस्थानी
बेरोजगारी, दारिद्र्य, दुष्काळ, स्त्रीयांवरील वाढते अत्याचार यासारख्या अनेक समस्यांना बगल देऊन धार्मिक भावनांमध्येच युवकांना गुंतवून ठेवणे व निवडणुकीत हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्याचा अजेंडा काही राजकीय पक्ष वापरतात. त्यासाठी त्यांच्या विविध सेल कार्यरत असल्याचे फॅक्ट चेकर मयुर देवकर यांनी स्पष्ट केले.