Mregs Embezzlement | हेराफेरी : बोगस सरपंचासह ग्रामसेवकाने हडपले लाखो रुपये

0

मग्रारोहयो प्रकरण ; अखेर गुन्हा दाखल 



वैजापूर ( Vaijapur  ) तालुक्यातील वीरगाव - मुर्शदपूर ग्रामपंचायतीमध्ये( Veergaon - Murshadpur Gram Panchayat ) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत ( Mregs  ) बोगस सरपंच ( Bogus Sarpanch ) व ग्रामसेवकाने ( Gramsevak ) तब्बल ६३ लाख ५७ हजार रुपयांचा अपहार ( Embezzlement ) केल्याप्रकरणी अखेर आठ दिवसानंतर वीरगाव पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द फसवणुकीचा ( Fraud  ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रक्कम हडप करणारे भामटे फरार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 











       भरत शिवाजी कदम (रा.वीरगाव) व महेश तुकाराम पवार (रा. नेवरगाव ता. गंगापूर) अशी दोघा भामट्यांची नावे आहेत. हे दोघेही फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती अशी की, याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वीरगाव-मुर्शदपूर ग्रामपंचायतीच्या बँक ( Bank Account) खात्यावरून ०१ नोव्हेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत एकूण ६३ लाख ५७ हजार २३६ रुपयांची रक्कम  परस्पर काढल्याचे सरपंच मनीषा थोरात यांच्या निदर्शनास आल्यानंतर  त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांसह ( BDO  ) महाराष्ट्र ग्रामीण बॅंक व्यवस्थापकांकडे ( Bank Manager ) तक्रार देऊन संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. 





दरम्यान एवढ्या मोठ्या रकमेचा अपहार झाल्यामुळे बॅंकेसह प्रशासन हादरून गेले. विशेष म्हणजे २४ जानेवारी रोजी याबाबत तक्रार देऊनही प्रशासन कासवगतीने कारवाई करीत होते. याबाबत ग्रामपंचायतीच्या अर्थिक व्यवहाराची जबाबदारी ही सरपंच व ग्रामसेवकाची असते. त्यामुळे तुमच्याकडे उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई करून आमच्या कार्यालयास अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी देव घुनावत यांनी लेखी पत्राद्वारे सरपंच व ग्रामसेवकास दिले होते . या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक शिवशंकर लाईटवार  सरपंच व ग्रामसेवकांनी सादर केलेल्या ठरावावर तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांची सही असल्याची शहानिशा करण्यात आली होती.





 दरम्यानच्या काळात विद्यमान सरपंच व ग्रामसेवक बॅंककडे फिरकलेच नाही. त्यामुळे संभ्रम झाला. परंतु असे असले तरीही आमच्या वरिष्ठ यंत्रणेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. याशिवाय आमच्याकडे उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेजचीही ( CCTV camera Footage) तपासणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाचा लवकरच पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान  यासंदर्भात वीरगाव पोलिस ठाण्यात ग्रामसेविका एस. व्ही. शेटे तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ( Tecnical Problem) हा गुन्हा दाखल झाला नव्हता. 




 हा गैरव्यवहार मोठा असल्यामुळे या प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे ( Senior Police officer) मार्गदर्शन ( Guidelines ) घेण्यात येत असल्याचे ठाणेप्रमुखांनी सांगितले होते. मोठा खल होऊन अखेर ०८ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा वीरगाव पोलिस ठाण्यात ग्रामसेवक सोनाली शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भरत कदम व तुकाराम पवार या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. वाघमोडे करीत आहे.




अचानक फरार कसे झाले? 



दरम्यान भरत कदम व त्याचा साथीदार फरार असल्याचा दावा पोलिसांनी केला असला तरी तो कालपर्यंत गावात उजळ माथ्याने फिरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे दोघेही अचानक फरार कसे झाले? असाही प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.




सदस्यच बनला बोगस सरपंच 



भरत कदम हा सध्या ग्रामपंचायत सदस्य असून ग्रामपंचायतीचा सरपंच म्हणून त्यानेच बँकेकडे सहीचे नेमून दिले होते. महेश पवार हा त्याचाच नातलग असून त्यालाही बोगस ग्रामसेवक बनवून त्याच्याही सहीचे नमूने बँकेला देण्यात आले. त्यानंतर एवढी मोठी रक्कम हडपण्यात आली.




Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top