Mregs Embezzlement | मग्रारोहयो अपहारात लाखोंची उड्डाणे; 'ती' नावे आली समोर

0

 वीरगाव - मुर्शदपूर ग्रामपंचायत


 

महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या मजुरांच्या टाळुवरचे लोणी खाल्ल्याचा प्रकार तालुक्यातील वीरगाव - मुर्शदपूर ग्रामपंचायतीमध्ये नुकताच उघडकीस आला आहे. दस्तुरखुद्द सरपंचांनी बॅऺकेतून काढलेल्या खाते उताऱ्यावरून ( स्टेटमेंट ) १८ जणांच्या नावावर लाखो रुपयांची रक्कम काढण्यात आली असल्याचे समोर आले आहे.  एका व्यक्तीच्या नावावर आठ लाखांपर्यंत रक्कम काढल्याचे त्यावरून दिसून येते. ही रक्कम धनादेश व आरटीजीएसव्दारे काढून शासनाच्या डोळ्यात उघडपणे धुळफेक केली आहे. लाखोंची उड्डाणे घेणारा हा अपहार आहे.





 




          याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वीरगाव-मुर्शदपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपद मनीषा थोरात यांना ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात काही तरी काळेबरे असल्याचा संशय आल्याने त्यांनी २४ जानेवारी रोजी  ०१ नोव्हेंबर २०२३  ते  जानेवारी २०२४  या कालावधीचा खाते उतारा (बँक स्टेटमेंट) काढला. या स्टेटमेंटमध्ये २७ डिसेंबर २०२३ पासून ग्रामपंचायतीच्या खात्यावरून कुणीतरी वेगवेगळ्या तारखेला एकूण ६३ लाख ५८ हजार रुपयांची रक्कम बनावट सरपंच व ग्रामसेवकाने परस्पर काढल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांसह महाराष्ट्र ग्रामीण बॅक व्यवस्थापकांकडे तक्रार देऊन संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. 




दरम्यान या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या गैरव्यवहाराचे वेगवेगळे किस्से बाहेर येऊ लागले आहेत. २५ डिसेंबर २०२३ ते २७ जानेवारी २०२४ या कालावधीच्या काढलेल्या खाते उताऱ्यावरून १८ जणांच्या नावावर लाखो रुपयांची उचल करण्यात आली आहे. एका व्यक्तीच्या नावावर आठ लाखांपर्यंत रक्कम काढण्यात आली आहे. ८ सप्टेंबर २०२३ रोजी बनावट सरपंच व ग्रामसेवकाच्या नावाने बनावट ठराव बॅकेला देण्यात आला. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी सहीचे नमूने बदलण्यासाठी अर्ज देण्यात आला. याचाच अर्थ रक्कम हडपण्यासाठी अगोदरपासूनच घाट घालण्यात आला होता. बॅक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सरपंच म्हणून भरत कदम व ग्रामसेवक म्हणून महेश पवार यांच्या नावाचा ठराव गटविकास अधिकाऱ्यांच्या सहीने प्रमाणित करण्यात आला असल्याचे म्हणणे आहे. परंतु कदम हे कदम कधीच सरपंच नव्हते आणि पवार हा ग्रामसेवक नव्हता. मग हे दोघे कोण आहे? असा प्रश्न उपस्थित होतो.





 मिळालेल्या माहितीनुसार भरत कदम हे सदस्य असून महेश पवार हा त्यांचाच नातलग आहे. सही नमूने अर्जावर या दोघांचेच छायाचित्र असून सह्या आहेत. गटविकास अधिकाऱ्यांच्या सहीने प्रमाणित करण्यात आलेला ठराव हा खरा आहे की बनावट? हेही चौकशीत निष्पन्न होणार आहे. परंतु या अपहारात सरपंचापासून, ग्रामसेवक, ठराव, सह्या व शिक्के बनावट असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. प्रशासकीय पातळीवर चौकशीच्य हालचाली सुरू झाल्या खऱ्या. परंतु बॅक खाते कुणी खाली केले. हे मात्र आजच उघड झाल्यासारखे आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.




 ते पदावर नव्हतेच



दरम्यान याबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकांना सरपंचांनी विचारपूस केली असता सरपंच म्हणून भरत शिवाजी कदम व ग्रामसेवक म्हणून महेश तुकाराम पवार या दोघांचे आधारकार्ड, सहीचे नमूने व त्यांच्या नावाचा ग्रामपंचायत मासिक सभा ठराव घेण्यात आला. विशेष म्हणजे ग्रामपंचायत ठराव हा गटविकास अधिकाऱ्यांच्या सहीने प्रमाणित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या कालावधीत हा अपहार झाला त्या कालावधीत महेश पवार हा ग्रामसेवक म्हणून कार्यरत नव्हताच. असेही गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत सरपंचांसह अन्य सदस्यांनी म्हटले आहे.




 रक्कम काढली. ती नावे अशी -




श्यामराव शिवाजी कलापुरे - ७  लाख रुपये, विष्णू विठ्ठल थोरात - एक  लाख ६८ हजार ४६१ रुपये, विजय सोमनाथ बारसे  - ३३ हजार ७७२ रुपये. रवींद्र नानासाहेब  - ६ हजार ३८७  रुपये, दौलत मुर्लिधर बारसे - ७ हजार ७७६ रुपये, लक्ष्मण काशीनाथ डहाके -  ३९ हजार ८०  रुपये,अजय सोमनाथ बारसे -  ४ लाख ९६ हजार २९ रुपये,सचिन वसंत विघे - ५ लाख  २९ रुपये,अमोल दौलत डहाके - ६ लाख ५९  हजार  ८२५ रुपये,भैय्या रमजान पठान - ३ लाख ४४ हजार १२७ रुपये,शिवाजी साहेबराव कलापुरे - ४८  हजार रुपये,फकीरा मारुती कदम - ८ लाख १०  हजार ६३० रुपये,कैलास रामदास म्हस्के - ५ लाख ८८ हजार ९० रुपये,रामकृष्ण बाबासाहेब - ३४  हजार ५०० रुपये,भाग्योदय एरीगेटर - ४३  हजार ९०० रुपये, रामकृष्ण बाबासाहेब - ३९ हजार १७३ रुपये,गोकुळ अशोक बारसे - १५ हजार ५ रुपये, ग्रामपंचायत वीरगाव - ६ लाख ५९  रुपये,अमोल दौलत डहाके - ६ लाख ७७१ रुपये

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top