Knife Attack | दारूसाठी पैसे न दिल्याने केला चाकू हल्ला

0

 माथेफिरूविरुद्ध गुन्हा 




 दारू पिण्यासाठी पैसे  न दिल्याने चाकूने हल्ला करणाऱ्या माथेफिरुविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भाऊसाहेब फकिरराव त्रिभुवन (रा.आघूर ह.मु. विनायकनगर कारखाना, बोरसर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. 









याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल किसन बागूल हा वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील रहिवासी असून मजुरी करून उदरनिर्वाह करतो. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भाऊसाहेब व राहुल बागूल यांची खंडाळा येथील देशी दारू अड्ड्यासमोर भेट झाली.




 दरम्यान भाऊसाहेब  याने राहुलकडे 'दारू पिण्यासाठी ५० रुपये दे' अशी मागणी केली. 'परंतु माझ्याकडे पैसे नाहीत' असे राहुलने त्याला सांगितले. दरम्यान काही समजण्याच्या आत भाऊसाहेबने त्याच्यावर चाकूने हल्ला चढविला. या हल्ल्यात राहुलच्या कानामागे व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी राहुल बागुल याने दिलेल्या फिर्यादीवरून भाऊसाहेब त्रिभुवन याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top