Education | 'शाळाबाह्य' कामे॑ : अन् गुरूजी शाळेतच तर्रर्र..बाटली.. ग्लास..आणि चकणा.!

0

पालकांनीच केला भांडाफोड 



वैजापूर  तालुक्यातील शिऊर परिसरातील जिल्हा परिषद शाळेच्या ( Z P School ) एका 'तळीराम' मास्तराचा ( Teacher ) पालकांनी भांडाफोड केला आहे. दरम्यान हा शिक्षक बहुतेकदा 'टाकून'च येतो अशी माहिती शाळेतील एका विद्यार्थीनीने दिल्याने जिल्हा परिषद शाळेचा शिक्षणाचा स्तर ही बाब पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली  आहे. दरम्यान या गुरूजींचा दारू पितांनाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल ( Viral ) होत आहे. 











 सुधीर देशमुख रा. शिऊर असे या तळीराम गुरुजीचे नाव असून आता त्याच्यावर काय कारवाई होणार ? याबाबत पालकांमध्ये उत्सुकता आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील शिऊर  ( Shiur ) केंद्रातंर्गत असलेल्या जिल्हा परिषदेच्या बागायतदार वस्ती शाळेतील शिक्षक नेहमीच शाळेत दारू पिऊन येतो. अशी माहिती  हिंदवी क्रांतीसेनेचे अजय साळुंके यांना मंगळवारी फोनवरून मिळाली. यामुळे त्यांनी शिऊर येथील जिल्हा परिषदेच्या बागायतदार वस्ती शाळेत भेट दिली असता शिक्षक सुधीर देशमुख हा मद्यधुंद अवस्थेत मिळून आला. 




शाळेत अजय साळुंके यांच्यासह एकत्र आलेल्या पालकांनी देशमुख यांना याबाबत विचारणा देखील केली. परंतु 'तल्लीन' अवस्थेत असल्याने ते निरुत्तरच राहिले. या सर्व प्रकाराबाबत गटशिक्षणाधिकारी हेमंत उशीर यांना माहिती मिळताच याबाबत त्यांनी  केंद्रप्रमुख साईनाथ कवार यांना शाळेत जाऊन पंचनामा करा. असे आदेश दिले. त्यानुसार दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास त्यांनी शाळेत जाऊन या 'मदिरा' नाट्याचा पंचनामा केला. त्यांनीही पंचनाम्यात शिक्षक सुधीर देशमुख हे मद्यधुंद ( Drunk ) अवस्थेत 'तल्लीन' असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान शाळेत दारूच्या बाटल्या, चकणा यासारखे आक्षेपार्ह साहित्य आढळून आले. 








या शाळेत इयत्ता १ ली ते ४ थी पर्यँत चे वर्ग भरतात. मंगळवारी दुपारी केंद्रप्रमुख शाळेत जाताच शाळेतील चौथी इयत्तेतील एका विद्यार्थीनीसह उपस्थितीत पालकांनी  'सर बहुतेकदा दारू पिऊनच शाळेत येतात' अशी तोंडी तक्रार व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे. तोही व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. दरम्यान या तळीराम गुरूजींचा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे शिक्षण विभागाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून खळबळ उडाली आहे.




'शाळाबाह्य' कामे शाळेतच 



 शाळाबाह्य कामांच्या नावाने गुरूजीमंडळी बोंबा मारीत असतानाच दुसरीकडे गुरूजींची अशी 'शाळाबाह्य' कामे मात्र शाळेतच बेफाम व खुलेआमपणे सुरू आहे. यावर नेमकं बोलायचे कुणी? नेमके चालले तरी काय ? यावर कुणाचं वचक आहे की नाही ? जिल्हा परिषद शाळेत असे शिक्षक असतील तर शाळेत असलेल्या चिमुकल्यांची शैक्षणिक पायाभरणी कशी होई ? या सारखे एक न अनेक प्रश्न समोर येत आहे. अगोदरच जिल्हा परिषद शाळांबाबत 'आधीच उल्हास अन् त्यातच फाल्गुन मास' अशी अवस्था असताना मदिरेच्या  आहारी गेलेल्या गुरूजींच्या हातात शाळा सोपविणार असाल तर धन्य तो शिक्षण विभाग ( Department of Education ) अन् धन्य ती शिक्षण व्यवस्था ( Education System ) !





शिऊर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक मद्यधुंद अवस्थेत असल्याची तक्रार ( Complaint  ) माझ्याकडे पालकांनी केली आहे. त्यानुसार मी केंद्रप्रमुखांना पंचनामा करण्यासाठी शाळेत पाठविले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित शिक्षकाविरुध्द कारवाई करण्यात येईल.


- हेमंत उशीर, गटशिक्षणाधिकारी, वैजापूर 




या शाळेतील शिक्षक हे नेहमीच मद्यप्राशन करून शाळेत येतात. आज मला पालकांचे फोन आल्यामुळे मी शाळेत गेलो तेव्हा सुधीर देशमुख मद्यधुंद होता. अशा शिक्षकांना बडतर्फ ( Dismissal )करायला पाहिजे. त्यामुळे पिढ्या घडणार नाहीतर बर्बाद होतील. शिक्षण विभागाने कारवाई न केल्यास आम्हाला ठोकशाहीचे धोरण अवलंबावे लागेल. फुकटाचा पगार देण्यापेक्षा यांना हाकलून लावा.


- अजय साळुंके, हिंदवी क्रांतीसेना, टुणकी

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top