शाळेचे बनविले होते 'मदिरालय'
जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेत ( Z P School ) मद्यधुंद अवस्थेत ( Drunk ) आढळलेल्या 'त्या' मास्तराविरुध्द ( Teacher ) अखेर शिऊर पोलिस ठाण्यात ( Shiur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर उत्तमराव देशमुख (५३) रा. शिऊर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गुरुजीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुधीर देशमुख हा तालुक्यातील शिऊर येथील बागयदातदार जिल्हा परिषद वस्ती शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ०६ फेब्रुवारी रोजी दुपारी सुधीर देशमुख हा शाळेत कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. याबाबत क्रांती सेनेचे अजय साळुंके यांच्यासह पालकांनी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास केंद्र प्रमुख एस. व्ही. कवार यांना फोनवरून ही माहिती दिली. कवार यांनीही गटशिक्षणाधिकारी हेमंत उशीर यांच्या कानावर हा प्रकार टाकला.
दरम्यान 'शाळेत जाऊन नेमका काय प्रकार आहे ? याबाबत खुलासा करा' असा आदेश उशीर यांनी केंद्रप्रमुखांना दिला. पावणे चार वाजेच्या सुमारास केंद्रप्रमुख शाळेत पोहचले. यावेळी त्यांना देशमुख मास्तर हे 'तर्राट' अवस्थेत आढळून आले. याशिवाय शाळेतील एका विद्यार्थीनीने देखील 'सर शाळेत नेहमीच पिऊन येतात' असे सांगितले. त्या ठिकाणी केंद्र प्रमुखांनी 'देशमुख दारू पिलेल्या अवस्थेत आढळून आला'. याशिवाय शाळेत दारूची रिकामी बाटली व चकणाही मिळून आल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे. याप्रकरणी एस. व्ही. कवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षक सुधीर देशमुख याच्याविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.