Political | 'ते' भाजपमधून गेले ठाकरेसेनेत, मुंबईत झाला सोहळा

0

उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश 



वैजापूर येथील भारतीय जनता पक्षाचे डाॅ. राजीव डोंगरे  ( Dr. Rajeev Dongre) यांनी आपल्या समर्थकांसह मुंबई येथे पक्षप्रमुख उध्द्वव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उध्द्वव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. 

  










मुंबई येथे मातोश्रीवर पक्षप्रमुख उध्द्वव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत डाॅ. राजीव डोंगरे यांच्यासह ज्ञानेश्वर इंगळे, अनिल साठे, अनिल सोनवणे, रवींद्र डोंगरे यांनी ठाकरेसेनेत प्रवेश केला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, संजय निकम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 




दरम्यान डाॅ. राजीव डोंगरे हे गेल्या वर्षांपासून भाजपमध्ये होते. सन २०१८ मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु ऐन निवडणुकीत भाजपने त्यांच्या पत्नीची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नाकारल्याने ते भाजपपासून काही काळ दूर गेले होते. दरम्यानच्या काळात म्हणजेच २०२१ मध्ये डॉ. डोंगरे यांनी भाजप प्रवेश करून ते पुन्हा स्वगृही परतले. आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर त्यांचा हा प्रवेश झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top