पूर्वाश्रमीच्या पतीसह सर्वच अडचणीत
प्रेमविवाह ( Love Marriage) करणाऱ्या युवकाची ( Youth ) फसवणूक ( Fraud ) झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील पाराळा ( Parala ) येथे उघडकीस आली. विशेष म्हणजे पहिला विवाह ( Frist Marriage) झालेला असतानाही पत्नीने लपवून ठेऊन दुसरा प्रेमविवाह ( Love Marriage) केला. यामध्ये तिला हेराफेरी करण्यासाठी ज्यांनी मदत केली. तेही अडचणीत सापडले आहेत. याप्रकरणी फसवणूक करणाऱ्या सरपंचासह ( Sarpanch ) ग्रामसेवक ( Gramsevak), पहिला पती ( Frist Husband),पत्नी व अन्य नातेवाईक अशा पाच जणांविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात ( Shiur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैजापूर तालुक्यातील पाराळा येथील अक्षय पोपट बावके या युवकाने कोपरगाव तालुक्यातील तळेगाव - मळे येथील युवतीशी प्रेम व आंतरजातीय विवाह केला होता. याची न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामपंचायत कार्यालयात विवाह नोंदणी करण्यात आली होती. मात्र अक्षय बावके यांच्या पत्नीने पहीला विवाह केलेला असताना दुसरा विवाह केला. तसेच ग्रामपंचायतीच्या विवाह नोंदणीमध्ये सरपंच व ग्रामसेवकाच्या मदतीने हेराफेरी करून अक्षय यांची फसवणूक केली. तसेच न्यायालयाची दिशाभूल केली.
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी अक्षय बावके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाराळ्याच्या सरपंच कल्पना गणेश आहेर , ग्रामसेवक ए. बी. सुरेश, पत्नी मयुरी अक्षय बावके, मयुरीचे वडिल रमेश शिवाजी क्षीरसागर, मयुरीचा नवीन पती सुरज बाबासाहेब पानगव्हाणे या पाच जणांविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार राहुल थोरात करीत आहेत.