Accident | कारने धडक दिली अन् सर्जा - राजा गेले

0

 रोटेगाव शिवारातील दुर्देवी घटना 




 

भरधाव कारने ( Car )  दिलेल्या जोरदार धडकेत (  बैलजोडी ( Pair of oxen) जागीच ठार तर ऊसतोड कामगार जोडपे गंभीर जखमी झाल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील रोटेगाव ( Rotegaon ) शिवारात घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.








 


   याबाबत अधिक माहिती अशी की, रवींद्र  काळुराम ठाकरे हे ऊसतोडीचे काम ( Sugar Cane Work) करतात. ते वैजापूर तालुक्यातील खरज ( Kharaj ) येथील रहिवासी आहेत. मंगळवारी त्यांनी रोटेगाव येथील एका शेतातील ऊसतोडीची काम आटोपून पती - पत्नी बैलगाडीने घराकडे (खरज) जात होते. दरम्यान रात्री नऊ वाजेच्या सुमारास रोटेगाव शिवारात वैजापूरहून खंडाळयाच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कारने (क्रमांक एमएच ४६ डब्लू १७११) त्यांच्या बैलगाडीला जोराची धडक दिली. या जोरदार धडकेत बैलजोडी जागीच ठार झाली तर रवींद्र व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. याप्रकरणी रविंद्र ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top