वीरगाव पोलिसांत १४ जणांविरुद्ध गुन्हा
नांदूर मधमेश्वर कालव्याच्या ( Nandur Madhmeshwar Canal) वितरीकेला ( खड्डा पाडून पाणी वळविणाऱ्या चौदा शेतकऱ्यांविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात ( Veergaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैजापूर तालुक्यातील वक्ती शिवारात कालव्याला भगदाड पाडून पाण्याची चोरी केल्याचा आरोप शेतकऱ्यांवर ( Farmers ) आहे.
संभा अशोक पठारे, दिलीप राधाकिशन पठारे, सचिन बाबुराव पठारे, बाळू राधाकिशन पठारे, रामदास पठारे, दत्तु रावसाहेब गायकवाड, विजय रामदास पठारे, रामदास दगडू वाघ, बाबासाहेब हरी, राजू गुडदे, दगडू जाधव, प्रकाश जाधव, गणेश दत्तू गुडदे, सुभाष बबन गुडदे (सर्व रा.वक्ती ता. वैजापुर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, नांमका कालव्याद्वारे सध्या आवर्तन सोडण्यात आले आहे. दरम्यान मंगळवारी दुपारच्या सुमारास वक्ती शिवारात असलेल्या कालव्याच्या साखळी क्रमांक १२१.७८० व १२२.५३३ या ठिकाणी शेतकऱ्यांनी कालव्याला मोठा खड्डा पाडून पाणी नाल्यात वळविले.याप्रकरणी नांदूर मधमेश्वर पाटबांधारे उप. वि.क्र. २ चे कनिष्ठ शाखा अभियंता चेतन वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेतकऱ्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.