खंबाळा शिवारात फोडला कालवा
नांदूर मधमेश्वर कालव्याच्या ( Nandur Madhmeshwar Canal) तळाला भगदाड पाडून पाणी वळवून चोरी करणाऱ्या १० जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा ( Vaijapur Police Station) दाखल करण्यात आला आहे. ही घटना तालुक्यातील खंबाळा ( Khambala ) शिवारात घडली.
नांदूर मधमेश्वर कालव्यातून रब्बी हंगामासाठी Rabbi Season) आवर्तन ( Rotation ) सोडण्यात आले आहे. तालुक्यातील खंबाळा शिवारात काही जणांनी कालव्याच्या तळाला भगदाड पाडून पाण्याची चोरी करून शासकीय मालमत्तेचे नुकसान ( Damage to Government property) केले. कनिष्ठ अभियंता सुनील पवार, सुभाष चन्ने, सहायक अभियंता विलास धामणे हे पेट्रोलिंग करीत असताना हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी कनिष्ठ अभियंता ( Jr Engineer) सुनील पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष रामराव इंगळे, दिलीप तुकाराम खंडागळे , रंगनाथ श्रीधर त्रिभुवन, ज्ञानदेव भिकाजी बनकर, भास्कर कचरू कोल्हे, अर्जुन विठ्ठल गलांडे, संतोष कारभारी लांडे , दादासाहेब बाबुराव कोल्हे , अप्पासाहेब नाईकवाडी, भिमा सुबा त्रिभुवन सर्व रा खंबाळा या दहा जणांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान दोनच दिवसांपूर्वी तालुक्यातील वक्ती शिवारातील नांदूर मधमेश्वर कालव्याला भगदाड पाडून पाण्याची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी १४ जणांविरुद्ध वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या दोनच दिवसांनंतर तालुक्यातील खंबाळा शिवारातील घटना उघडकीस आली.