BJP's Gaon Chalo Abhiyan | भाजपचे 'गाव चलो अभियान'

0

वैजापुरात संवाद बैठक 



 

राज्यभरात सध्या भाजपकडून 'गाव चलो अभियान'  ( Village Campaign) राबविण्यात येत आहे. याद्वारे नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजप ( BJP ) जिल्हाध्यक्ष संजय खंबायते  यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील भाजप कार्यालयात संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.











     दरम्यान 'गाव चलो अभियानातर्गंत  मागील १० वर्षात मोदी सरकारच्या कार्यकाळातील विविध योजनांची माहिती ( Information Of  Schemes) जनतेपर्यंत पोहचावी. या मुख्य हेतूसह सुरू असलेले हे अभियान  ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत पोहचवावे असे. आवाहन जिल्हाध्यक्ष संजय खंबायते व  डॉ दिनेश परदेशी यांनी केले.  





या बैठकीला वैजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ. दिनेश परदेशी ( Dr. Dinesh Pardeshi) , अभियान जिल्हा संयोजक मधुकर वालतुरे, एकनाथ जाधव, तालुकाध्यक्ष  नारायण कवडे, जयमाला वाघ, जिल्हापाध्यक्ष प्रेम राजपूत, शहराध्यक्ष दिनेश राजपूत, संदीप ठोंबरे, शैलेश पोंदे, सुरेश राऊत, प्रभाकर गुंजाळ, वैशाली पवार, अनिता तांबे, ज्ञानेश्वर आदमाने, वसंत पवार, बाबुराव चव्हाण, गिरीश चापनेरकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top