महिलाही झाली जखमी
विहीरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या तरुणाला ( youth ) चुलत भावांसह चुलत्याने लोखंडी रॉडने ( Lron Rod ) जबर मारहाण केली. दरम्यान भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची आई देखील या मारहाणीत गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात ( Vaijapur Police Station) तिघा बाप - लेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडेराव बडे, नानासाहेब बडे व गोरख बडे सर्व रा. नांदगाव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, काशाबाई बाळू बडे यांची नांदगाव शिवारात शेतजमीन आहे. मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा दीपक हा शेत गट क्रमांक ६३ मधील विहिरीवर मोटार सुरू करण्यासाठी गेला होता.
यावेळी त्याचा चुलता खंडेराव, चुलत भाऊ नानासाहेब व गोरख हे तिघे त्या ठिकाणी होते. काही समजण्याच्या चुलत भावानी दिपकला लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दीपकच्या आईला देखील खंडेराव याने डोक्यात रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले.