Anandnanagari | 'त्यांनी' शाळेतच लावले खाद्यपदार्थांचे स्टॉल

0

विद्याधन शाळेत भरली आनंदनगरी 


वैजापूर शहरालगत ( Vaijapur City  ) असलेल्या विद्याधन इंग्लिश स्कुलमध्ये  आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी ( Students  ) विविध खाद्य पदार्थांचे एकूण ३० स्टॉल लावले होते. 







आनंद नगरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या व्यवहार कुशलतेचा विकास व्हावा हा मुळ उद्देश असल्याचे शाळेचे संचालक दिगंबर गायके यांनी यावेळी सांगितले. आनंदनगरीचे उदघाटन झाल्यानंतर  मुला-मुलींना आनंदनगरी व बालआनंद मेळाव्यातून वेगवेगळे स्टॉल लावून  खाद्यपदार्थ विकून व्यावहारीक ज्ञानासोबत आर्थिक व्यवहारही हाताळण्याचे ज्ञान मिळते. जे त्यांच्या भविष्यात उपयुक्त ठरू शकेल. असे शाळेच्या अध्यक्ष आशा गायके यांनी यावेळी बोलताना सांगितले. याप्रसंगी सचिव दिगंबर गायके, शांतीलाल कोठाळे, प्राचार्या आरती पाटील, राहुल जाधव , मोहिनी मापारी, पुनम भागवत, पारखे ,शिंदे ,तुपे, अंभोरे, थोरे,शेलार, अंभोरे,कासार, आहेर यांच्यासह  पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top