Maratha Reservation | आंदोलक आक्रमक; भररस्त्यावर जाळपोळ

0

 रोटेगावनजीक वाहतूक खोळंबली 






 





मराठा आरक्षणासाठी ( Marathon Reservation) समाज आक्रमक झाला असून वैजापूर शहरालगत असलेल्या नाशिक - छञपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावरील ( Nashik - Chatrapati Sambhajinagar National Highway) रोटेगाव ( Rotegaon ) येथे आंदोलकांनी रास्तारोको ( Block the way) करून महामार्गावर टायर्स जाळले. त्यामुळे महामार्गावर वाहतूक खोळंबली होती.











       मनोज जरांगे यांचा अंतरवली सराटी येथे उपोषणाचा सलग सातवा दिवस असताना राज्यशासनाने अद्याप त्यांच्या मागण्यांबाबत कुठलेही ठोस पावले न उचल्याने छत्रपती संभाजीनगर-वैजापूर महामार्गावर हा रस्तारोको करण्यात आला. यावेळी रस्त्यावर टायर्स जाळून आंदोलकांनी  राज्य सरकारविरुद्ध ( State Government) घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे बराच वेळ वाहतूक खोळंबून वाहनांच्या लांबच - लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top