Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Accidental Death | विजेचा धक्का लागला अन् अघटित घडलं !

 





 विद्युत मोटार सुरु करतांना विजेचा शॉक लागल्याने शेतकऱ्याचा मृत्यु झाला. ही घटना वैजापूर तालुक्यातील नांदगाव येथे बुधवारी सकाळी घडली. नवनाथ भास्कर कोल्हे (वय ३९) असे मृताचे नाव आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नवनाथ हे सकाळी शेतात विद्युत मोटार सुरु करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासुन मृत घोषित केले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार संतोष सोनवणे अधिक तपास करीत आहेत.‌

Post a Comment

0 Comments