सर्वांचे झाले कौतुक
छत्रपती संभाजीनगर ( Chatrapati Sambhajinagar ) येथे घेण्यात आलेल्या विभागीय अबॅकस ( Abacus ) स्पर्धेत ( competition ) वैजापूर ( Vaijapur ) येथील आयेशा जोहेब खान व प्रांजल भोसले या विद्यार्थीनी गटात संपूर्ण विभागातून सर्वप्रथम आल्या तर प्रणल चव्हाण, स्वरा जोशी त्यांच्या गटातून द्वितीय, श्रेयस देवकर ,अनन्या मगर हे त्यांच्या त्यांच्या गटातून तृतीय आले तर आरुष आवारे हा विद्यार्थी विभागातून पाचवा आला.
या विभागीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे केंद्र म्हणून बेस्ट परफॉर्मर्स अवॉर्ड देऊन आयजीएम सुपर अबॅकसच्या संचालिका संध्या शिऊरकर यांना गौरविण्यात आले. या शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देऊन छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित विभागीय स्पर्धेत सहभाग नोंदविला. या विद्यार्थ्यांना संध्या शिऊरकर यांचे मार्गदर्शन लाभले. नागेश शिऊरकर, मनीष महाजन, विनोद जैन यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.