वैजापुरात 'आयुष्मान'चे ८० हजार कार्ड !

0

 by satyarthi group,

 

मोफत उपचार मिळणार ; आणखी एक लाखाचे उद्दिष्ट 

वैजापूर | आयुष्मान योजना नागरिकांसाठी मोठी दिलासादायक ठरत आहेत. या योजनेतर्गंत आतापर्यंत वैजापूर तालुक्यात ८० हजारांहून अधिक नागरिकांचे आयुष्मान कार्ड बनविण्यात आली आहे तर अजून एक लाख नागरिकांची कार्ड बनवायची आहेत. महसूल विभाग बरोबरच आरोग्य विभागही प्रयत्नशील आहे. आयुष्मान कार्ड घेणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत.


आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत पात्र कुटुंबांची आयुष्मान भारत ई-केवायसी  करण्याचे काम केले जात आहे. ग्रामपंचायत स्तरावर आणि शहरी भागात आयोजित केलेल्या शिबिरांमध्ये आयुष्मान कार्ड देखील बनवले जात आहेत. भारत विकास संकल्प यात्रेत अलीकडे या शिबिरांमध्ये नवीन कार्ड बनविण्यास सुरवात झाली आहे, तर गेल्या वर्षीपर्यंत सुमारे 80 हजार वैजापूरवासीयांना कार्ड मिळाले आहेत. भारत विकास संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे वैजापूर तालुक्यातील एक लाख नागरिकांना याच लाभ होणार आहे.


 नव्याने आणखी एक लाख नागरिकांना आयुष्मान कार्ड देण्याचा  सरकारने संकल्प केला आहे. एक लाखाहून अधिक नागरिकांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.उद्दिष्टात राहिलेल्या लाभार्थ्यांची कार्ड बनविण्याची प्रक्रिया ई-केवायसी करून पूर्ण केली जाईल, जेणेकरून लाभार्थ्यांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येईल.आरोग्य विभाग आयुष्मान कार्ड बनविण्याचे काम सातत्याने करत आहे.


 यासंदर्भात तहसीलदार सुनील सावंत यांनी एका झालेल्या बैठकीत कठोर सूचना दिल्या आहेत. शक्य टक्के टार्गेट लवकरात लवकर पूर्ण करावे आणि वैद्यकीय विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना ई-केवायसीचे टार्गेट देण्यात यावे. असे त्यांनी सांगितले आहे. आरोग्य अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत.





असंसर्गजन्य आजारांची तपासणी, क्षयरोग तपासणी व  अनेक आजारांनी ग्रस्त असलेल्या लोककल्याणकारी योजनांपासून वंचित असलेल्या नागरिकांना योजनांशी जोडून त्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. याअंतर्गत या शिबिरांमध्ये आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात येत आहे. बनविण्याचे काम सुरू असून सर्वसामान्य नागरिकांनी शिबिरात आधारकार्ड व मोबाईल सोबत आणावेत, जेणेकरून शिबिरात कार्ड बनवता येईल.


- जी. एस. इंदूरकर, आरोग्य अधिकारी, वैजापूर

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top