by satyarthi group,
वैजापूर | क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शहरातील मौलाना आझाद विद्यालयात सावित्रीच्या 'लेकींनी, मौलाना आझाद विद्यालयात प्रेरणा जिजाऊंची, वसा सावित्रीचा फाउंडेशन अंतर्गत आयोजित सावित्रीमाईच्या विचारांचा जागर केला.
सावित्री बाईंच्या वाटेवरून चालताना त्यांच्या विचारांचा जागर व्हायलाच हवा. या भावनेने स्वत:च्या घरापासूनच सुरवात करीत ज्ञानाची एक पणती लावत व सोबत एक पुस्तक विकत घेऊन सावित्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिंचडगाव केंद्रप्रमुख शोभाताई पवार होत्या. प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी, माजी नगरसेविका माधुरी बनकर, सुनंदा माळी, डॉ.ज्योती मोहन, तळेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरवात पुस्तकांची गुढी उभारून व सावित्रीबाईंच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी शिक्षिका संगीता गोरे, सुनीता कुळधर , छाया उचित , मनीषा गायकवाड, मुख्याध्यापिका मीना शिंदे, रुपाली बागुल, शीतल कांबळे ,अंजनी कांबळे आदी उपस्थित होत्या .
तसेच सावित्रीउत्सव कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनिता दयाटे यांनी केले तर सूत्रसंचालन मीरा टेके यांनी केले. आभारप्रदर्शन प्रज्योती जानेकर यांनी केले. यासाठी उत्तमराव पवार व नारायण सांळुके यांचे विशेष सहकार्य लाभले. शिक्षिका संगीता गोरे, कुळधर (होले)मॅडम,उचित मॅडम , गायकवाड मॅडम,मुख्याध्यापिका मीना शिंदे मॅडम, रुपाली बागुल आदीं सावित्रीच्या लेकीची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सावित्रीउत्सव कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनिता दयाटे यांनी केले तर मीरा टेके यांनी सूत्रसंचालन केले. तसेच आभारप्रदर्शन प्रज्योती जानेकर यांनी केले. यासाठी उत्तमराव पवार, नारायण सांळुके यांचे विशेष सहकार्य लाभले.