मकरसंक्रांत म्हटलं की, पतंगबाजी आलीच. एरवी नेतेमंडळी वर्षभर राजकीय पतंगबाजी करीत असतात. यातून थोडी उसंत काढून छंदफंद जोपासण्याचे कामही ते करतात. याचा प्रत्यय वैजापूरकरांना आला.
मकरसंक्रांतीला शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे व भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी या दोघांनाही पतंग उडवायचा मोह आवरला नाही. राजकारणात दोघेही 'दबंग' म्हणून ओळखले जातात. जनतेसाठी तत्पर अन् तितकेच हौशीही.
मकरसंक्रांतीला वैजापूर येथील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुलभा भोपळे यांच्या बंगल्याच्या गच्चीवर या दोघांच्या पतंगबाजीने रंगत आणली. या दोघांत मग माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी मागे कशा राहतील? त्यांनीही दोर हातात घेऊन पतंगबाजी केली.
सोबत संजय बोरनारे, डॉ. सुभाष भोपळे, डॉ. परेश भोपळे, डॉ. प्रीती भोपळे , अमोल बोरनारे आदींसह अन्य महिला व कार्यकर्त्यांनीही आनंदी घेतला.