by Satyarthi Group
वैजापूर | शहरातील दत्तनगर
परिसरात नायलाॅन मांजाची विक्री
करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली.
गणेश उर्फ लिलाधर पारसनाथ त्रिभुवन
(१९ रा. दत्तनगर, वैजापूर)
असे आरोपीचे नाव आहे.
त्याच्याकडून पोलिसांनी ४ हजार ९०० रुपये किंमतीचा नायलाॅन मांजा जप्त केला आहे .
याप्रकरणी अंमलदार नवनाथ केरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गणेश त्रिभुवन विरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार कवडे हे करीत आहेत.