नांमका'च्या ७० लाखांच्या 'टार्गेट'चे काय..?

0

   by satyarthi group,


वैजापूरसह गंगापूरसाठी आवर्तन सोडले; पाणीपट्टी वसुलीचे भिजघोंगडे 

 

वैजापूर | नाशिक जिल्ह्यातून नांदूर मधमेश्वर कालव्याव्दारे वैजापूरसह गंगापूर व कोपरगाव या तिन्हीही दुष्काळी भागात रब्बी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात आले. त्यांमुळे हजारो हेक्टरवरिल सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला.आता या पाण्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ बघयला मिळत आहे. सन  २०२२-२३ या वर्षात 'नांमका'च्या आवर्तनातून पाणीपट्टी वसुलीसाठी तब्बल ७० लाखांचे 'टार्गेट' देण्यात आले आहे.



नाशिक नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात अनेक मोठी धरणे असून १२० किलोमीटर लांबीचा  कालवा आहे. यात नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील ७, वैजापूर तालुक्यातील सर्वाधिक ४९ तर गंगापूर तालुक्यातील ४६ गावांचा समावेश असून तिन्हीही तालुक्यातील ४३ हजार ५६० हेक्टर लाभक्षेत्राला पाणी देणारी ही योजना आहे. या योजनेतून खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशी तीन आवर्तने सोडली जातात. यामुळे लाभ क्षेत्रातील गावांना याचा मोठा फायदा होत आहे. मुळात योजना म्हटलं की पाणीपट्टी वसुली आलीच.परंतु या योजनेच्या लाभ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात फळबाग व ऊसाचे क्षेत्र असतानाही  ७० लाखांची पाणीपट्टी वसूल करण्यासाठी अधिकाऱ्यांना मोठ्या अडचणी येत आहे.


तोकडे मनुष्यबळ अन् कार्यालयप्रमुखांची फटफजिती


वैजापूर येथील पाटबंधारे विभागाच्या नांदूर मधमेश्वर विभागात मंजूर २२३ पैकी तब्बल १८८ पदे रिक्त आहे. त्यामुळे केवळ ३५ कर्मचाऱ्यांवर तालुक्यातील कालव्यासह कार्यलय व आवर्तन सुटल्यानंतर देखरेख व पाणीपट्टी वसुलीसाठी नियोजन करताना येथील कार्यलयप्रमुख कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांची चांगलीच फटफजिती होताना दिसत आहे.


 'तो' वसूली करणारा अभियंता  कोण? 


तिन्ही तालुक्यातील ४३ हजार ५६० हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी ४९ पोटचाऱ्याद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो.मात्र पोटचारी क्र.२२ ची जलसंपदा विभागात चांगलीच चर्चा आहे. कारण या पोटचारीतून मिळणारा महसूल गेल्या कित्येक वर्षांपासून शासनाला नव्हे तर एका तत्कालीन अभियंताच्या खिशात जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही जादू वैजापुरातून अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतरही बघयला मिळत आहे. दरम्यान या 'वसूली' अभियंत्यांची वरिष्ठनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top