आता मुरूम माफियांचा धुडगूस, ३९ जणांना नोटीस

0

 

 

गंगथडी भागातून बेसुमार उपसा, पुजाऱ्यासह ग्रा. पं. पदाधिकारी बनले तस्कर 


 वाळूमाफियांबरोबरच तालुक्यात आता मुरूम माफियांनी धुडगूस घातला आहे. पुनर्वसनासाठी संपादीत केलेल्या जमिनीसह सरकारी गायरान जमिनीतून अवैधरीत्या मुरमाची वाहतूक व उत्खनन केल्याप्रकरणी तालुक्यातील बाभुळगावगंगा येथील ३९ जणांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये माजी सरपंच, विद्यमान उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मंदिराचा पुजारी , जेसीबी, पोकलेन व ट्रक्टर चालकांचा समावेश आहे.

   


   तालुक्यातील  नांदूरढोक शिवारातील गट नंबर १७,१८  व १९ या सरकारी गायरान जमिनीतून , बाभुळगावगंगा शिवारातील गट नंबर ३१,३२,३३ व ३५ तसेच गाव पुनर्वसनासाठी संपादीत जमिनीतून व नांदूरढोक शिवारातील गट नंबर ८३ मधून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या मुरमाची वाहतूक व उत्खनन करण्यात आले आहे. 


हे उत्खनन गावातीलच नागरीकांनी केले आहे. याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने ३९ जणांना उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उत्खनन झालेल्या जागेची ईटीएस मोजणी करून या अहवालानुसार आपणास दंड का आकारू नये? 


शासनाच्या लाखो रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान केल्याने आपल्या मालमत्तेवर बोजा का चढवू नये? तसेच आपली मालमत्ता खरेदी - विक्री करण्यास प्रतिबंध का करण्यात येऊ नये? असे प्रश्न उपस्थित करून कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागविण्यात आला आहे. दोन दिवसांत खुलासा मागविण्यात आला आहे.


मुरूम माफियांची नावे अशी 


या कारणे दाखवा नोटीसमध्ये उदय कुंजीर, उमाकांत कुंजीर, योगेश घोडे, विजय कुंजीर, राजेंद्र कुंजीर, जालिंदर कुंजीर, शिवाजी कुंजीर, कारभारी बोरगे, भाऊसाहेब बोरगे, योगेश घंगाळे , संतोष घंगाळे, दत्तात्रय घंगाळे,नाना घंगाळे, रमेश कुंजीर,शरद कुंजीर, सुभाष गायधने, राहुल गायधने ,सतीश बोरगे, भाऊसाहेब कुंजीर,किरण कुंजीर, राजेंद्र बोरडे, चंद्रशेखर बोरडे, नारायण घोडे, चंद्रभान कुंजीर, बाबासाहेब कुंजीर, जगदीश जाधव,नाना जाधव, रवींद्र जाधव, गोकुळ वराडे, योगेश बाजारे, दादासाहेब शिंदे, रामभाऊ शिंदे,किसन शिंदे, दिलीप परदेशी, रोहित परदेशी, कैलास परदेशी, शिवाजी बाजारे या ३९ जणांचा समावेश आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top