Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Maratha Reservation : सर्वेक्षणासाठी प्रगणकांना प्रशिक्षण

 पंचायत समितीच्या सभागृहात बैठक 


खुल्या व मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्यासाठी उपविभागिय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड व तहसीलदार सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली  पंचायत समितीच्या सभागृहात प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात आले. २३ जानेवारी ते ३१ जानेवारी या कालावधीत ४०२ प्रगणक व २९ पर्यवेक्षकांच्या माध्यमातून वैजापूर शहरासह तालुक्यात हे सर्वेक्षण करण्यात येणार असून यात मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील समाज घटकांचेही ( ब्राह्मण, जैन, राजपूत मुस्लिम, शिख आदी) सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 





या प्रशिक्षणासाठी शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, कृषि सहायकांची प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.‌ २३ जानेवारीपासून घरोघरी जाऊन हे पर्यवेक्षक माहिती संकलित करणार आहेत. त्यांना नागरिकांनी आपल्या कुटुंबाची माहिती देऊन सहकार्य करावे. असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रशिक्षक म्हणून शिक्षण अधिकारी मनीष गणवीर व तालुका प्रशिक्षक म्हणुन पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मनीष दिवेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


 पंचायत समितीच्या सभागृहात उपविभागिय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, तहसिलदार सुनील सावंत, नायब तहसिलदार किरण कुलकर्णी, दीपक त्रिभुवन यांच्या उपस्थितीत सर्व प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात आले. गोखले इन्स्टिट्युट या खासगी संस्थेमार्फत तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲपद्वारे हे सर्वेक्षण करण्यात येणार असून सर्वेक्षण पूर्णपणे पेपरलेस असणार आहे.

Post a Comment

0 Comments