by satyarthi group,
वैजापूर | शहरातील डेपो रस्त्यावरील साई ग्राफिक्स या डिजिटल फलक छपाई करणाऱ्या दुकानाला ११) जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागून या घटनेत जवळपास १२ ते १५ लाखांचे नुकसान झाले आहे. अग्निशमक दलाने तासाभराच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली. त्यामूळे मोठा अनर्थ टळला. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे शहरातील वीजपुरवठा काही काळ खंडीत करण्यात आला होता.
वैजापूर शहरातील डेपो रस्त्यावर डिजिटल ग्राफिक्सचे दुकान आहे
वैजापूर शहरातील डेपो रस्त्यावर डिजिटल ग्राफिक्सचे दुकान आहे. गुरूवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील या दुकानाला अचानक आगीने वेढले. काही मिनिटातच ही आग सर्वत्र पसरली. धुराचे लोट निघू लागले. आगीची माहिती कळताच अनेकांनी धाव घेत मदत सुरू केली.
आगीचे लोळ खिडकीतून बाहेर पडत होते.
नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. या कर्मचाऱ्यांनी शिडी लावत वरच्या मजल्यावरील खिडक्या उघडल्या. गॅलरीमध्ये चढत पाण्याचा मारा केला. दरवाजा उघडून तासाभरात ही आग आटोक्यात आणली. दुकानाला आग लागल्याचे समजताच अनेकांनी धाव घेत जमेल तशी मदत केली.
सर्वधर्मिय नागरिकांनी यावेळी मदत केल्याचे दिसून आले.
आमदार रमेश बोरनारे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी यांनी तातडीने कार्यकर्त्यांना जमविले. अनेक तरूणांनी शर्थीचे प्रयत्न केल्याचे यावेळी दिसून आले. नगरपालिका अग्निशामक दलाचे वसीम शेख, सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख, अमजद अली, कलीम शेख यांच्यासह अन्य नागरिकांनी जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.