भाऊंच्या सोबतीला तात्यांचे 'सारथ्य' !

0

 by satyarthi group 

 राजकारणात कायमस्वरूपी कुणी कुणाचे शत्रू अथवा मित्र नसतात.याचा प्रत्यय वारंवार येत असतो. राजकारण त्या - त्या वेळेपुरते असतं अन् मैत्रीही असतेच. हे अनेकवेळा नेत्यांच्या वागण्यावरून स्पष्ट झाले आहे. राजकारणात अथवा निवडणुकीत नेहमीच एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ठाकरेसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर ( तात्या  ) व भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी ( भाऊ  )या दोघांना पाहिले जाते. 


नागरिकांच्या भुवया उंचावल्या

परंतु रविवारी दोघेही एका कार्यक्रमातच नव्त  तर कारमध्ये एकत्र आले आले अन् तालुक्यातील राजकीय वर्तुळासह नागरिकांच्या भुवया उंचावल्या. या छायाचित्रात तात्या कार चालवताना तर भाऊ बाजूला बसलेले दिसताहेत.


सरपंच दत्तात्रय कुंदे यांनी नवीन क्रेटा कार आणल्यानंतर


      त्याचे झाले असे की, तालुक्यातील खरज येथील सरपंच दत्तात्रय कुंदे यांनी नवीन क्रेटा कार आणल्यानंतर त्यांनी पुजेसाठी ठाकरेसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर व भाजप नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दिनेश परदेशी या दोघांना खरजात बोलावले. 


पाहता चिकटगावकरांनी गाडीच्या स्टेअरिंगचा ताबा घेतला आणि बाजूला सोबतीला डॉ. परदेशी बसले.

त्यानंतर उभयतांनी तेथे जाऊन कारणे पुजन केले अन् पाहता - पाहता चिकटगावकरांनी गाडीच्या स्टेअरिंगचा ताबा घेतला आणि बाजूला सोबतीला डॉ. परदेशी बसले. उभयतांनी गाडीचा चक्कर मारला किंवा नाही. हे अद्याप गुलदस्त्यात आहे. परंतु या दोन नेत्यांच्या एकत्रित व कारमधील छायाचित्राने राजकीय वर्तुळात चांगलीच धूम केली आहे. राजकारणात या दोघांचा नेहमीच छत्तीसचा आकडा राहिलेला आहे. 


राजकारणात छत्तीस ; कार्यक्रमात मात्र हम 'साथ- साथ हैं' 

याशिवाय तालुक्यात झालेल्या बहुतांश निवडणुकीत एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकून उभे राहणारे ते फक्त दोघेच आहेत. आमदारकीपासून ते नगराध्यक्षपदाची निवडणूक या दोघांनी विरोधात लढविलेली आहे. एवढेच नव्हे तर पालिका निवडणूक आघाडी करून लढविल्याचीही उदाहरणे आहेत. 

कट्टर राजकीय विरोधक आणि कट्टर मैत्री 

राजकीय विरोधक म्हणून असले तरीही त्यांच्यात मैत्रीचं मधूर नातेही तितकेच दृढ आहे. निवडणुकीत विरोधक अन् कार्यक्रमात मात्र 'हम साथ - साथ हैं' असा प्रवास गेल्या २० वर्षांच्या अधिक काळापासून दोघांच्याही सुरू आहे. दोघांचीही राजकीय कारकीर्द कमीजास्त सोबतच सुरू झाली आहे. कट्टर राजकीय विरोधक आणि कट्टर मैत्री असं अजब समीकरण या दोघांचं आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top