१११ कोटी मंजूर , आले मात्र ६५ कोटीच !

0

   by satyarthi group   

 

अनुदानाच्या रकमेला कात्री ; अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली 



वैजापूर |शेतकऱ्यांसाठी अनुदानाची घोषणा १३ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर केली अन् वाटप करताय ८ हजार ५०० रुपये हेक्टरी. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तसेच तालुक्यासाठी १११ कोटी मंजूर झाले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र ६५ कोटी रुपये आले. गेल्यावर्षी सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणाऱ्या अनुदान रकमेत शासनाने हेक्टरमागे चक्क ५ हजारांची कात्री लावल्याने शेतकरी आता तहसील कार्यालयात रकमेविषयी जाब विचारत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.




गेल्यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे तालुक्यातील ८२ हजार २६२ हेक्टरवरील उभ्या पिकांची माती झाली होती. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने १३ हजार ५०० रुपये हेक्टरी मदत जाहीर केली होती. 


अखेर वर्षभरानंतर हे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा होत आहे. परंतु शासनाने १३


हजार ५०० रुपये हेक्टरी जाहीर केले होते. परंतु खात्यावर ८ हजार ५०० रुपये हेक्टरप्रमाणे अनुदान जमा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तब्बल ५ हजारांचा फटका बसत आहे. याविषयी शेतकरी आता तलाठी , तहसीलच्या अधिकाऱ्यांना भेटून अनुदानाविषयी जाब विचारत आहे. दरम्यान याविषयी अधिकारी शासनाकडे बोट दाखवून वेळ मारताना दिसत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top