खबरदार.! शर्तींचा भंग कराल तर...गाळयांना सील ठोकल्याचे प्रकरण.. एसडीएम संतापले .!

0

 शासनाच्या जागेवर ठाण मांडून बसलेल्या व्यापाऱ्यांचे फेर रद्द करणार 



वैजापूर शहरातील डेपो रस्त्यावरील वसंत क्लबच्या मालकीच्या गाळ्यांचे भाडे वाढविण्यात येऊन येवला रस्त्यावरील बोथरा पेट्रोलपंपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत ज्यांनी जागा काबीज केल्या त्या सर्व जागांचे फेर रद्द करणार आहे. माझ्याविरुद्ध न्यायालयात जा अथवा मला तुरुंगात टाका. मी कुणालाही घाबरणार नाही. परंतु शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करावेच लागेल. असा खणखणीत इशारा उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांनी शहरातील वसंत क्लबमध्ये आयोजित बैठकीत दिला.



शहरातील डेपो रस्त्यावरील वसंत क्लबच्या मालकीच्या गाळ्यांना टाळे ठोकल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार प्रा. रमेश बोरनारे, भाजपचे माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप , डाॅ. विठ्ठल शिंदे , मर्चंटस् बॅकेचे चेअरमन विशाल संचेती, माजी उपनगराध्यक्ष अकील शेख आदींची यावेळी उपस्थिती होती. 


यावेळी डॉ. अरुण जऱ्हाड म्हणाले की, वसंत क्लबच्या मालकीच्या जागेवर बहुतांश व्यापाऱ्यांनी बेकायदा मालकी हक्क लावून सातबारावर नावे नोंदवून घेतली आहे. ही शासनाच्या मालकीची जागा आहे. येवला रस्त्यावरील बोथरा पेट्रोलपंपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत जागेचा मी फेर रद्द करणार आहे.याशिव क्लबच्या जागेवर ज्या व्यापाऱ्यांचे गाळे आहेत. त्या भाडेकरूंना १ जानेवारीपासून नव्याने करार करून भाडेवाढ करण्यात येणार आहे. रेडीरेकनर दराप्रमाणे ही भाडेवाढ असणार आहे. याशिवाय अनामत रक्कमही भरावी लागेल. भाडेवाढ देऊन तुम्ही शासनावर उपकार करीत नाही आहात. ज्यांना या अटी मान्य असेल त्यांनी तेथे थांबावे अन्यथा मी सर्व गाळे पाडून तेथे समाजपयोगी वास्तू बांधण्यात येईल. गेल्या ४० वर्षांपासून ६० , २०० रुपये भाडे देऊन आपण शासनाची फसवणूक करीत आहात. त्यामुळे ज्यांना गाळे पाहिजे. त्यांना अटींचे पालन करावे लागेल अन्यथा चालते व्हा. असा खणखणीत इशारा जऱ्हाड यांनी दिला. 


आमदार रमेश बोरनारे यांनी शासनाच्या नियमानुसार नवीन करार करा. मागे झाले - गेले विसरा. उपविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करा. असे सांगितले.


 डॉ. दिनेश परदेशी यांनीही यासाठी सहमती दर्शवून पालिकेच्या नगररचना विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत जागेचे मोजमाप करून त्यानुसार भाडेवाढ ठरविण्यात येईल. असे सांगितले. याप्रसंगी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top