रामचंद्रांच्या भक्तीमुळेच कारसेवकांना जीवाची पर्वा नव्हती : रामगिरी महाराज

0

 वैजापूर येथे कारसेवकांचा सत्कार ; स्मृतिचिन्ह देऊन गौरव


 

प्रभू रामचंद्रांबाबत मनात असलेल्या निस्सीम भक्तीमुळेच हजारो कारसेवक आपल्या जीवाची पर्वा न करता अयोध्येत गेले. यातील अनेकांना वीरमरण आले. ही भक्तीच या कारसेवकांचे प्रेरणास्थान होती. रामचरित मानस हा प्रभू रामचंद्रांचा ग्रंथ किंवा अर्जुनाला उपदेश सांगणारी श्रीकृष्णाची गीता धर्माचरणाचा आधार आहेत. असे प्रतिपादन सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी केले. वैजापूर येथील लक्ष्मीनारायण लॉन्सजवळ अयोध्येत कारसेवेसाठी गेलेल्या तालुक्यातील कारसेवकांचा सत्कार त्यांच्याहस्ते करण्यात आला. 





 कार्यक्रमास हभप राजेश्वरगिरी महाराज, भरतगिरी महाराज, विष्णुगिरी महाराज, हभप रामभाऊ महाराज यांच्यासह डॉ. हेडगेवार पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत कंगले, तालुकाध्यक्ष नारायण कवडे , मधुकर वालतुरे, जयमाला वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वैजापूर तालुक्यातून अयोध्या येथे कारसेवेसाठी गेलेल्या भगवानदास भाटीया, बाळासाहेब चव्हाण, दामोदर पारीक यांच्यासह उपस्थित कारसेवकांचा महाराजांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. 


सुरुवातीला एकनाथ जाधव व हर्षला जाधव यांनी महाराजांचे पूजन केले. प्रभू रामचंद्र यांचे आचरण म्हणजेच धर्म होय. अशी धर्म सेवा करणारे कारसेवक खरोखर भाग्यवंत आहेत. येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांनी प्राणप्रतिष्ठा होत आहे. या दिवशी दिवाळी साजरी करा. असे आवाहन महाराजांनी केले. कार्यक्रमास सुनील पैठणपगारे, ज्ञानेश्वर इंगळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 


    जितेंद्र आव्हाडांचा तीव्र निषेध 


दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्र हे मांसाहारी असल्याचा उल्लेख केला होता. त्यासाठी त्यांनी दिलेले वाल्मिकी रामायणातील अयोध्याकांडातील अध्याय क्रमांक १०२ मधील प्रमाण योग्य नसल्याचे रामगिरी महाराज यांनी सांगितले.  हे रामायण मी वाचले असून त्यात शिकारीचा उल्लेख आहे व भोजनासाठी प्रभू राम कंदमुळे खात असल्याचे स्पष्ट केले आहे. तेव्हा हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू रामाबद्दल  बेताल वक्तव्य करणाऱ्यांना दंडित केले पाहिजे. २०१९ मध्ये शरद पवार यांनी देशाला रामायण महाभारतातील गरज नाही. असे वक्तव्य केले  होते. असेही ते म्हणाले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top