रामराव ढोक महाराज यांचे प्रतिपादन
जगात आदर्श रामराज्य निर्माण व्हावे म्हणूनच अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. रामराज्य म्हणजे धर्माचे राज्य होय. अशा शब्दांत रामायणाचार्य हभप रामराव ढोक महाराज यांनी केले.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर यांनी सोमवारपासून वैजापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर रामायणाचार्य हभप रामराव ढोक महाराज यांच्या श्रीराम कथेचे आयोजन केले आहे. यावेळी जनसमुदायासमोर महाराजांनी उपदेश केला. रामराज्य म्हणजे धर्म राज्य होय. माणसांनी ,माणसांशी,माणसासारखे वागावे. हा धर्म होय.
आणि अशा मानवीय मूल्यांच्या धर्माचा आरंभ घरापासून व्हावा तरच पुन्हा रामराज्य प्रस्थापित होईल. असे ते म्हणाले. प्रारंभी कार्यक्रमाचे आयोजक माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, त्यांच्या पत्नी विजया चिकटगावकर, अजय पाटील चिकटगावकर, प्रशांत शिंदे यांनी प्रभू रामचंद्र ,रामभक्त हनुमान , छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे व ढोक महाराजांचे पूजन केले.
कथेचे पहिले पुष्प ढोक महाराज गुंफताना पुढे म्हणाले, देशात सज्जनांच्या संघटनेचा अभाव असल्याने समाज अस्थिर स्थिती आहे. प्रभू रामचंद्र अयोध्येत विराजमान झाल्याने आता सज्जन संघटित होतील व देशात रामराज्य येईल. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मनाजी मिसाळ, भाऊसाहेब गलांडे, साईनाथ मतसागर, देविदास वाणी यांच्यासह ग्रामीण भागातील नागरिक उपस्थित होते. यावेळी मेणबत्या प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करण्यात आला मंगळवार पासूनदररोज कथेची वेळ सायंकाळी सहा ते रात्री नऊ अशी ठेवण्यात आली आहे.