Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

Nandur Madhmeshwar Canal | 'ते' शेतकरी करणार आत्मदहन.!

 'नांमका' वितरिकेचा मोबदला मिळेना 


नांदूर मधमेश्वर कालव्याच्या वितरिकेसाठी संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने तालुक्यातील वीरगाव-मुर्शदपूर येथील शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी या आशयाचे पत्र देखील संबंधिताना दिले आहे. 




 

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदूर मधमेश्वर कालव्याच्या वितरिका क्रमांक ११ वरील डावी उपवितरीका क्रमांक २ मध्ये १७ वर्षांपूर्वी ३.३९ हेक्टर इतके क्षेत्र संपादित करण्यात आले होते. दरम्यान भूसंपादनानंतर शेतकऱ्यांनी संबधित विभागाने मोबदला दिला नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या अनुषंगाने नांमका कार्यलायत संपर्क केल्यानंतर 'तुमची संचिका सापडत नाही' असे उत्तर त्यांना देण्यात आले. ८ सप्टेंबर २००९ रोजी नांदूर मध्यमेश्वर कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ' आम्ही तुमची रक्कम उपविभागीय कार्यकारी अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांच्याकडे जमा केली' असे लेखी पत्राद्वारे कळविले. 


दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी नांमका कार्यालयाला तीनवेळा पत्रव्यवहार केला होता. परंतु शेतकऱ्यांच्या पत्रव्यवहाराची दखल घेण्यात आली नसल्याचा देखील आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रश्न निकाली निघत नसल्याने अखेर शेतकरी राजाराम थोरात यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी २६  जानेवारी रोजी तालुक्यातील वीरगाव ग्रामपंचायतीसमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

Post a Comment

0 Comments