Sanjay Raut | 'मायावी' सीता कधी इकडे अन् तिकडेही ; राज्यात पुन्हा रामायण

0

खा. संजय राऊतांचा उपरोधिक टोला 



 

प्रभू श्रीराम अयोध्येत होते. पण रामायण महाराष्ट्रात झाले. छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम यांच्यासारख्या आदर्श व्यक्तिमत्व असलेल्या राज्यात हिंदू ह्रदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी नेतृत्व केल्यामुळे शिवसेना उभी राहिली व आजही त्यांच्या नेतृत्वामुळे पक्षाची वाटचाल सुरु आहे.‌ रामायणातील मायावी सीता कधी इकडे तर कधी तिकडे असते. असा उल्लेख करीत आगामी काळात महाराष्ट्रात पुन्हा रामायण घडणार आहे. असा उपरोधिक टोला राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मारला. राज्यात शिवराज्य स्थापन करण्यासाठी जनतेने शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पाठीशी खंबीरपणे उभे रहावे यासाठी महाराजांचे आशिर्वाद घेण्यासाठी आम्ही इथे आहोत असे. ते म्हणाले. 








शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी वैजापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर  रामायणाचार्य हभप रामरावजी ढोक महाराज यांच्या श्रीराम कथेचे आयोजन केले आहे. कथेच्या पाचव्या दिवशी राऊत यांच्यासह माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कार्यक्रमस्थळी हजेरी लावली. 



यावेळी आयोजक भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, विजया चिकटगावकर, अजय पाटील चिकटगावकर,  यांच्यासह ॲड. आसाराम रोठे, अविनाश गलांडे, संजय निकम, सचिन वाणी, प्रशा़त शिंदे, मनाजी मिसाळ, साई मतसागर, लिमेश वाणी, दिनकर पवार, उत्तम निकम यांनी त्यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केले. त्यांनी महाराजांचे पूजन केले व राऊत यांच्याहस्ते आरती करण्यात आली. 



हिंदवी स्वराज्य संस्थापक व सर्व भारतीयांचे आराध्य दैवत असलेले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज  यांनी संपूर्ण मानव जातीला स्वाभिमानाचे पाठ शिकवून रामराज्य साकारले तेच रामराज्य --शिवराज्य पुन्हा स्थापन करण्यासाठी व दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी जनतेने शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहवे. असे आवाहन राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन प्रशा़ंत शिंदे यांनी केले‌.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top