वाहतूक चिन्हांबाबत जनजागृती
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानातर्गंत वाहतूक पोलिसांच्यावतीने वैजापूर शहरातील नवीन बसस्थानकासह विविध ठिकाणी जनजागृती करण्यात आली. महामार्ग अपघात शून्य करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून १४ फेब्रुवारीपर्यंत हे अभियान राबविले जाणार आहे.
छञपती संभाजीनगर येथील वाहतूक शाखेचे फौजदार शशिकांत तायडे, हवालदार संजय तेली, किशोर महेर, संतोष गिरी, योगेश्वर शिंदे व वैजापूर पोलिस ठाण्याचे वाहतुक शाखेचे गणेश पैठणकर यांनी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानातर्गंत नवीन बसस्थानकात जाऊन प्रवासी विद्यार्थ्यांसह प्रवाशांमध्ये वाहतूक चिन्हांबाबत जनजागृती केली. याशिवाय विना लायसन्स, मद्यप्राशन, ट्रिपल सीट, विना हेल्मेट वाहन चालविणे होणारा आर्थिक दंड व शिक्षेबाबत माहिती दिली.