रामराव ढोक महाराजांची रसाळ वाणी
वैजापूर येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या प्रांगणात येत्या २२ जानेवारीपासू रामायणाचार्य हभप रामराव ढोक महाराज यांच्या श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री सात ते दहा या वेळेत हा कार्यक्रम होणार असून २८ जानेवारी रोजी या कथेची सांगता होणार आहे.
या कार्यक्रमाचे ध्वजपूजन सराला बेटाचे मठाधिपती रामगिरी महाराज व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याहस्ते करण्यात आले. माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर विधीवत ध्वजपूजन करण्यात आले.
यावेळी आयोजक भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, शिवसेनेचे ॲड. आसाराम रोठे, संजय निकम, सचिन वाणी, प्रकाश चव्हाण, अजय पाटील चिकटगावकर, विशाल संचेती, साई मतसागर, दिनकर पवार, प्रशांत शिंदे, डॉ. राजीव डोंगरे, उत्तम निकम, रिखब पाटणी, रमेश सावंत, मधुकर महाराज, विलास धने यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.