Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

.

नालेगाव विद्यालयात क्रीडादिन साजरा

वैजापूर  तालुक्यातील नालेगाव येथील भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले वैयक्तिक पदक जिंकणारे खाशाबा जाधव यांच्या जन्मदिवसानिमित्त  विद्यालयात  राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला.






 यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बी. एम. हजारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक दत्तात्रय सुरासे,भरत निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षकांनी  कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करू पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरम्यान  विद्यालयात रस्सीखेच,कब्बडी,सायकलिंग आदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुनिल भवर, राजेश्वर विभुते, मनीषा उभेदळ, रोहिदास त्रिभुवन,भारत भोपळे, प्रविण जाधव, प्रवीण जाधव, निर्मला शिरसाठ, गंगाधर कटारे, गोकुळ पवार, योगेश शिंदे, जयश्री बोर्डे, मंगेश दुतोंडे,किशोर साळुंके, विशाल साबळे आदींसह शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments