गडकिल्ले - राममंदिर प्रतिकृती आकर्षण
वैजापूर येथील शिवसेना महिला आघाडीच्यावतीने मकर संक्रांतीनिमित्त महिलांसाठी घेण्यात आलेला हळदी - कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या संपर्क कार्यालया समोरील प्रांगणात या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मराठमोळा या उत्सवात शिवरायांच्या शौर्य आणि कार्य कर्तृत्वाची साक्ष नोंदवणाऱ्या गड किल्ल्यांची प्रतिकृती तसेच २२ जानेवारी रोजी अयोध्येत लोकार्पण करण्यात आलेल्या श्रीराम मंदिरांची प्रतिकृती या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला अभिवादन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुलभाताई भोपळे, जिल्हा संघटक छायाताई बोरनारे, सीमाताई, जगताप, रेखाताई बोरनारे, तालुका संघटक पदमाताई सांळुके, शहर संघटक सुप्रिया व्यवहारे, सरपंच तेजस्विनी जगताप, जिल्हा उपसंघटक करुणाताई पोळ, अबोली बोरनारे, सुधा मुंगी, माजी नगरसेविका डॉ.प्रिती भोपळे, मुमताज सौदागर, उपशहरप्रमुख निशा गोरक्ष,अरुणा त्रिभुवन, भाग्यश्री आहेर रोहिणी गायकवाड, वर्षाताई बोरनारे, सुवर्णा थोरात, दिपाली शिंदे, चंद्रकला शिंदे, लता त्रिभुवन, मनिषा शिंदे यांची उपस्थिती होती. याशिवाय कार्यक्रमात शहर व ग्रामीण भागातील महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. आयोजकांकडून त्यांना वाण देण्यात आले.