सावित्रीच्या लेकींनी मकरसंक्रांतीला दिले पुस्तकांचे 'वाण'

0

 चारोळ्यासंग्रह महिलांना देऊन स्तुत्य उपक्रम 


 

मकरसंक्रांती  सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी सौभाग्याचं लेणं म्हणून महिला एकमेकांना वस्तूरुपी वाण देऊन हा सण साजरा करतात. वैजापूर शहरातील जीवनगंगा सोसायटी येथील महिलांनी एकमेकांना वाण म्हणून पारंपरिक वस्तू न देता स्त्री शिक्षणाच्या जननी  सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा गौरव करणाऱ्या  चारोळ्यांच्या संग्रहरुपी पुस्तकांचे वाण म्हणून वाटप केले. 

 




 कविता कसबे, ज्योती घाडगे, शीतल नरवडे,अलका बागुल, सुलक्षणा जोगदंड, अनिता पवार,छाया जाधव या महिलांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम आयोजित केला होता. माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, माजी नगरसेविका सुप्रिया व्यवहारे यांनाही आमंत्रित करून जीवनगंगा सोसायटीतील महिलांनी भेट देऊन सावित्रीबाई फुले यांच्या चारोळ्यासंग्रहाचा वाण दिला. महिलांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)
.
To Top